शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या यादीत निम्मे नवीन चेहरे

By admin | Updated: July 15, 2014 01:00 IST

युवक, युवतींना संधी : शरद पवार यांचे धोरण; सर्वेक्षण सुरू; आठ दिवसांत अहवाल देणार

राजाराम लोंढे-  कोल्हापूर ,, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीत ४० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. यामध्ये युवकांसह युवतींचा समावेश केला जाणार आहे तसे धोरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तयार केले असून, त्यानुसार गोपनीय सर्वेक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल येत्या आठ-दहा दिवसांत प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. लोकसभा निवडणुकीतील पराभव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जिव्हारी चांगलाच लागला आहे. विरोधकांचे हल्ले परतावून लावण्यासारखे काँग्रेसकडे फारसे ताकदीचे नेते नसल्याने विधानसभेच्या निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्या हातात घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. मतदारसंघनिहाय त्यांनी स्वबळावर लढल्यानंतर काय समीकरणे तयार होतील, त्याचा फायदा नेमका कोणाला होईल. याबाबत अहवाल मागवला आहे. मध्यंतरी युवकांचा मेळावा घेऊन अनेक जागांबाबत खुद्द शरद पवार यांनीच चाचपणी केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीत ४० टक्के युवक, युवतींसह विविध प्रवर्गाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आघाडी केली तर किमान पाच जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि त्यातील किमान दोन महिला व युवकांना संधी देण्याचे निश्चित आहे. कागल - हसन मुश्रीफराधानगरी- के. पी. पाटीलचंदगड- नंदिनी बाभूळकर, बी. एन. पाटील-मुगळीकर, रामराजे कुपेकरशिरोळ - राजेंद्र पाटील-यड्रावकर, विठ्ठलराव नाईक -निंबाळकरइचलकरंजी- धैर्यशील माने, अशोक स्वामी, अशोकराव जांभळेहातकणंगले -अशोकराव माने, किशोर कोरगांवे किंवा जनसुराज्य मित्रपक्षपन्हाळा-शाहूवाडी- भारत पाटील, रणवीरसिंग गायकवाड, किंवा जनसुराज्य मित्रपक्षउत्तर- मधुरिमाराजे छत्रपती, आर. के. पोवार (शहरातील इच्छूकही संपर्कात)दक्षिण -अरुंधती महाडिक, राजलक्ष्मी खानविलकर, प्रताप कोंडेकरकरवीर- धैर्यशील पाटील-कौलवकर, मधुकर जांभळे, पी. जी. शिंदे(या यादीवर नजर टाकल्यास किमान सात मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार बेताचेच असल्याचे स्पष्ट दिसते)मधुरिमाराजे यांच्या नावाची चर्चामाजी आमदार मालोजीराजे यांचे निवडणुकीबाबत ‘नरो वा कुंजरोवा’ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसमधून त्यांचे नाव मागे पडू लागले आहे. पण जागावाटपात ही जागा आपल्याकडे घेऊन तेथून त्यांच्या पत्नी व दिवंगत नेते दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे यांना रिंगणात उतरण्याच्या हालचाली राष्ट्रवादीच्या पातळीवर सुरू आहेत. रामराजेंना लिफ्ट..संग्रामला डच्चूचंदगडच्या उमेदवारीवरून कुपेकर कुटुंबीयांमध्ये उभी फूट पडली आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी नंदिनी बाभूळकर यांचे नाव पुढे केल्याने संग्राम कुपेकर यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. ‘एव्हीएच प्रकल्प’, ‘दौलत’च्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक सत्ताधाऱ्यांना जड जाणार आहे. हा वाद मिटवण्याची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवली असली तरी सर्वमान्य तोडगा म्हणून बी. एन. पाटील-मुगळीकर व रामराजे कुपेकर यांची नावे पुढे येऊ शकतात. यादीत रामराजे याचे नाव असले तरी संग्राम कुपेकर यांचा मात्र उल्लेखच नाही.