शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात कोरोना रुग्णांचे दिवसांत अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:36 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे तब्बल ५१ नवीन रुग्ण आढळून आल्याने चिंतेत आणखी भर पडली. गेल्या ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे तब्बल ५१ नवीन रुग्ण आढळून आल्याने चिंतेत आणखी भर पडली. गेल्या काही दिवसांत गुरुवारी प्रथमच मोठ्या संख्येने रुग्ण आढळले आहेत. नवीन ५१ पैकी २४ रुग्ण हे कोल्हापूर शहरातील आहेत. रुग्ण संख्या वाढत चालल्याने चाचण्यांची संख्याही गुरुवारी १९५६ वर पोहोचली. जिल्ह्यात आता २२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाची साथ संपुष्टात येत असल्याची चिन्हे जानेवारी महिन्यात दिसत होती; परंतु फेब्रुवारी महिन्यात मात्र कोरोनाने पुन्हा एकदा धोक्याची घंटी वाजविली. रोज आठ ते दहा नवीन रुग्ण आढळून यायचे तेथे आता तीस-चाळीस रुग्ण आढळून यायला लागले. गुरुवारी तर हा आकडा ५१ वर जाऊन पोहोचला. कोरोना रुग्णांनी बऱ्याच दिवसांनी अर्धशतक ओलांडले. त्यामुळे सर्वसामान्य कोल्हापूरकरांबरोबरच प्रशासनाचीही चिंता वाढत चालली आहे.

कोरोनाचे नवीन रुग्ण वाढतील तशी कोरोना चाचण्याची संख्याही वाढली आहे. गुरुवारी संपलेल्या चोवीस तासांत शासकीय तसेच खासगी प्रयोगशाळेतून १९५६ व्यक्तींच्या चाचण्या झाल्या. शासकीय प्रयोगशाळेतून १६०४ आरटीपीसीआर, तर ७८ ॲन्टिजेन चाचण्या झाल्या. त्यामध्ये १९ रुग्णांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले, तर खासगी हॉस्पिटल व प्रयोगशाळेतून २७४ व्यक्तींच्या चाचण्या झाल्या. त्यामध्ये ३२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

-आठ तालुक्यांत नवीन रुग्ण -

ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रवेश होत असल्याचे गुरुवारी पहायला मिळाले. आजरा, भुदरगड, कागल तालुक्यांत प्रत्येकी एक, तर चंदगड, गगनबावडा, शिरोळ, नगरपालिका हद्दीत प्रत्येकी दोन नवीन रुग्ण आढळून आले. गडहिंग्लज तालुक्यात चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. इतर जिल्ह्यांतून तपासणीला आलेल्या दहा व्यक्तींना कोरोना झाल्याचे त्यांच्या चाचणीतून स्पष्ट झाले.

आरोग्य यंत्रणा सतर्क-

राज्यात सगळीकडे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. येथील सीपीआर रुग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

२८ हजार ७७७ कर्मचाऱ्यांना लस-

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यातील २८ हजार ७७७ कर्मचाऱ्यांना ही लस टोचण्यात आली, त्यापैकी कोल्हापूर महानगरपालिकेने ९४६५ कर्मचाऱ्यांना लस टोचली आहे. ही प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यात २८ केंद्रे कार्यरत आहेत.

मागील पाच दिवसांतील रुग्ण

२१ फेब्रुवारी : १२

२२ फेब्रुवारी : २०

२३ फेब्रुवारी : ४७

२४ फेब्रुवारी : ३३

२५ फेब्रुवारी : ५१