शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींच्या नववर्षाची सुरुवात शंखध्वनीन

By admin | Updated: January 2, 2015 00:18 IST

शिक्षण उपसंचालक कार्यालय : अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित देण्याची मागणीे

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील खासगी प्राथमिक शाळेतील संचमान्यतेपूर्वी अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्यावतीने येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज, गुरुवारी शंखध्वनी आंदोलन करण्यात आले़ यावेळी शासन, शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री तसेच शिक्षण सचिवांच्या नावाने गुरुजनांनी शंखध्वनी केला़ यावेळी महासंघाचे शहराध्यक्ष संतोष आयरे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सहायक शिक्षण संचालक संपत गायकवाड यांना दिले़ या निवेदनात म्हटले आहे, शासनाने कोल्हापूर शहरातील खासगी प्राथमिक शाळेतील संचमान्यतेपूर्वी अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅक्टोबर २०१५ पासून रोखलेले आहे़ त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ तसेच २०१३/१४ च्या संचमान्यतेमध्ये सर्वच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविले आहे. त्यामुळे अशा शेकडो कर्मचाऱ्यांचे वेतन जानेवारी २०१५ पासून थांबणार आहे़ अतिरिक्त ठरविलेले कर्मचारी हे कायम कर्मचारी आहेत़ १९८१ च्या कायद्यातील तरतुदीनुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन दुसरीकडे होत नाही, तोपर्यंत त्यांचा पगार मूळ शाळेतून देण्याची तरतूद आहे़ असे असूनही शासनाने गेल्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रोखून त्यांच्यावर अन्याय केला आहे़ या आंदोलनात एम़ डी़ पाटील, राजेंद्र कोरे, रंगराव कुसाळे, राजाराम संकपाळ, शीतल नलवडे, सुधीर पोवार, यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)