शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

गुंड स्वप्निल तहसीलदारचा वाढदिवस कार्यक्रम उधळला

By admin | Updated: May 3, 2015 01:09 IST

पोलिसांची कारवाई : समर्थकांवर लाठीमार; मैदानावरील मंडप काढला

कोल्हापूर : पोलीस रेकॉर्डवरील गुंड व ‘एस.टी.’ गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम शनिवारी पोलिसांनी उधळून लावला. मुक्त सैनिक वसाहत येथील मैदानावर विनापरवाना वाढदिवसाचा कार्यक्रम होणार असल्याचे कळताच शाहूपुरी पोलिसांनी तेथे जाऊन कारवाई करीत आलिशान मंडपासह इतर साहित्य काढून टाकले. शीघ्र कृती दलाच्या सशस्त्र जवानांसह दोनशे पोलीस या कारवाईत सहभागी झाले होते. यानंतर रात्री मुस्कान लॉन येथे हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे समजताच पोलिसांनी रात्री साडेदहाच्या सुमारास तेथही जाऊन तहसीलदार समर्थकांना लाठीमार करीत पिटाळून लावले. यावेळी काहीजणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली. पोलीस रेकॉर्डवरील ‘एस.टी.’ गँगचा म्होरक्या तहसीलदार याच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमाचे आयोजन मुक्त सैनिक वसाहत येथील मैदानावर केले होते. या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी तहसीलदार याने शाहूपुरी पोलिसांच्या गोपनीय विभागाकडे अर्ज केला होता; परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली होती. दरम्यान, परवानगी न घेता तहसीलदार याने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने निमंत्रणपत्रिकाही काढल्या. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार राजेश क्षीरसागर व संजय कदम यांना निमंत्रित केले होते, तर माजी नगरसेवक राजेंद्र डकरे, राजेंद्र कसबेकर, नगरसेवक रशिद बारगीर, अनिल आवळे, नंदू डकरे, प्रा. एकनाथ काटकर, सुनील काटकर, इकबाल शेख, मिलिंद धोंड आदींची निमंत्रणपत्रिकेत प्रमुख उपस्थितांमध्ये नावेही छापली होती. सकाळपासून येथील सृजन आनंद विद्यालयाच्या पाठीमागील मैदानावर भव्य मंडप व स्टेज उभे केले. सभोवताली प्रखर विद्युत रोषणाई, जनरेटर व डॉल्बीची व्यवस्था केली होती. या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी त्याचे समर्थक करीत होते. दरम्यान, या घटनेची माहिती शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना समजताच त्यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास फौजफाट्यांसह धाव घेतली. यावेळी पोलिसांचा फौजफाटा पाहून समर्थक पळून गेले. शीघ्र कृती दलाच्या सुमारे ५० जवानांसह पोलिसांनी मंडपासह इतर साहित्य काढून टाकले. तहसीलदार याच्या घरी जाऊन त्याची चौकशी केली असता तो पसार झाल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी पोलीस तळ ठोकून होते. या कारवाईची माहिती समजताच पाहुण्यांसह समर्थक फिरकलेच नाहीत, तर परिसरातील नागरिकांनी कारवाई पाहण्यासाठी मैदानाच्या बाहेर गर्दी केली होती. दरम्यान, मुक्त सैनिक वसाहत मैदान येथील कार्यक्रम उधळल्यानंतर तहसीलदार समर्थकांनी पोलिसांना चकवा देत त्याच परिसरातील मुस्कान लॉन येथे वाढदिवस कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. याची माहिती रात्री साडेदहाच्या दरम्यान शाहुपुरी पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच मुस्कान लॉन वर पोलिस फौजफाटा गेला. पोलिसांनी येथे उपस्थित असलेल्या तहसीलदार समर्थकांवर लाठीमार करीत त्यांना पिटाळून लावले. लॉनमध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बाहेर काही समजत नव्हते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस जमल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)