शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग संस्थांच्या कर्जाची हमी घ्या

By admin | Updated: July 17, 2014 00:17 IST

उपमुख्यमंत्र्यांना निवेदन : रिपब्लिकन पार्टीच्या शिष्टमंडळाची मागणी

कोल्हापूर : दलित, अल्पसंख्याक समाजाच्या यंत्रमाग संस्थांना वस्त्रोद्योग धोरणांतर्गत अर्थसाहाय्य करण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे. परंतु, सरकारने आर्थिक टंचाईचे कारण पुढे करत अशा संस्थांना अर्थसाहाय्य आणि एन.सी.डी.सी.च्या कर्जाला हमी देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे जाहीर केल्याप्रमाणे अल्पसंख्याक व दलित समाजाच्या यंत्रमाग संस्थांच्या कर्जाची हमी राज्य सरकारने घ्यावी, अशा मागणीचे निवेदन काल, मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट)च्या एका शिष्टमंडळाने काल शासकीय विश्रामगृहावर उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. राज्यातील अन्य योजनांना मदत करण्यासाठी सरकारकडे निधी आहे. तसेच त्याच्या कर्जाच्या हमीला तयारी दाखविली जाते. परंतु, दलित आणि अल्पसंख्याक समाजाच्या विकासाकरिता निधी व कर्जाची हमी घेण्याचे फेटाळल्यामुळे समाजात निराशा पसरली आहे. म्हणून राज्य सरकारने शासनदरबारी प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांच्या प्रस्तावांना ४५ टक्के वाटा देऊन मंजुरी देण्यात यावी. त्याचबरोबर एन.सी.डी.सी.च्या कर्जाची हमी घ्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात ‘रिपाइं’चे राज्य सचिव प्रा. शहाजी कांबळे, विनोद कांबळे, अमर कांबळे, नंदकुमार गोंधळी, दयानंद कांबळे, बैजू कांबळे, विजय चव्हाण, दावित बनगे, मोहन सोनवणे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)