शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोतोली बाजारपेठेतील वाढती गर्दी चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोतोली बाजारपेठेत सकाळच्या सत्रात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोकांची मोठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोतोली बाजारपेठेत सकाळच्या सत्रात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोकांची मोठी गर्दी होत असल्याने परिसरात कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. शासनाने पुकारलेल्या लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी अकरा वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी दिली असल्याने या संधीचा फायदा घेत बाजारपेठेतील इतर व्यावसायिक देखील आपली दुकाने उघडी ठेवत असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी उसळत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये कोतोली हे कोरोनाचे हाॅटस्पाॅट केंद्र बनले होते.

सध्या कोतोलीसह परिसरात कोरोनाचे अनेक पाॅझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. ते बाजारपेठेत खुलेआमपणे फिरले गेल्याचे पुरावेदेखील समोर आहेत, तर जवळच असलेल्या तेलवे गावातील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यूदेखील झाला आहे. परंतु, या बाबीचे गांभीर्य नागरिकांना व व्यापार्‍यांना नसल्यामुळे सकाळच्या सत्रात दररोज जणू आठवडा बाजार भरल्याची स्थिती निर्माण होत आहे. कोरोनाचा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मागील वर्षाप्रमाणे सक्रिय राहून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

चौकट

कोरोना समित्या सक्रिय होण्याची गरज

मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी कोतोली व परिसरातील गावांतील कोरोना समित्या सक्रिय होत्या. त्यामुळे बाहेरगावाहून येणार्‍या व्यक्ती व संशयितांची माहिती घेतली जात होती. प्रशासकीय अधिकारी गावाला भेट देऊन पाॅझिटिव्ह रुग्णाच्या घराशेजारचा परिसर सील करत असल्याने संसर्ग साखळी तोडण्यास मदत होत होती. मात्र, आता तसे कुठेही होताना दिसत नाही.

२७ कोतोली

फोटो : कोतोली (ता. पन्हाळा) येथे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली खरेदीसाठी नियमित मोठी गर्दी उसळत आहे.