शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांसाठी अनुदान वाटप अर्जांची सुरुवात, पालकमंत्र्यांचा पुढाकार : १५ हजार बांधवांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:26 IST

कोल्हापूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या रिक्षाचालकांच्या मदत वाटपाच्या ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरु झाली. कोल्हापुरातील १५ हजार ...

कोल्हापूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या रिक्षाचालकांच्या मदत वाटपाच्या ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरु झाली. कोल्हापुरातील १५ हजार २५७ रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपयांचे हे अनुदान मिळणार आहे. या अनुदानाचा शंभर टक्के रिक्षाचालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून यापुढेही रिक्षा चालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

हे अनुदान परवानाधारक रिक्षाचालकांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन राज्यमंत्री व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा चालकांच्या शासकीय अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी रिक्षाचालक आणि रिक्षा वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींना दिले. शंभर टक्के रिक्षाचालकांना हे अनुदान मिळाले पाहिजे यासाठी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त रिक्षाचालकांना या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी. कोरोनाच्या या परिस्थितीत रिक्षाचालकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस म्हणाले, पालकमंत्री पाटील यांनी रिक्षाचालकांना आर्थिक मदत व्हावी म्हणून शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे हे अनुदान मिळणार असल्याचे सांगून सर्व रिक्षा परवाना धारकांच्यावतीने त्यांचे आभार मानले. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, रोहित काटकर, राजवर्धन करपे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी, रिक्षाचालक आणि रिक्षा वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ही माहिती भरा..

ऑनलाईन अर्ज करतांना प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर रिक्षा नंबर, लायसन्स नंबर व बॅंक खात्याला लिंक केलेला आधार नंबर भरणे गरजेचे आहे.

२४०५२०२१-कोल-रिक्षाचालकांना मदत

कोल्हापुरात राज्य शासनाने जाहीर केलेल्या रिक्षाचालकांच्या मदत वाटप ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सोमवारपासून सुरू झाली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारिस, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आदी उपस्थित होते.