शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

आजऱ्याचे ग्रामदैवत वाहनांच्या गराड्यात

By admin | Updated: November 26, 2014 00:06 IST

देवस्थानचा विरोध : कुंभार पे अँड पार्ककरिता अडचण

ज्योतीप्रसाद सावंत -आजरा आजऱ्याचे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिर परिसर म्हणजे खासगी वाहनांचा पार्किंग तळ बनला असून, देवस्थान कमिटीने यामध्ये लक्ष घालून वाहन पार्किंगबंद करून येथे पार्किंग बंदीसाठी बोर्ड लावण्याची मागणी होत आहे. आजऱ्याचे ग्रामदैवत रवळनाथाचे शहरात भरवस्तीत मंदिर आहे. मुळातच मुख्य मंदिराची इमारत वगळता येथे शिल्लक राहणारी जागा ही अत्यंत कमी आहे. मुख्य मंदिराच्या एका बाजूला गणपती मंदिर व असणारी रिकामी जागा फाटक लावून बंद ठेवली जाते.परिणामी मंदिराच्या मागील बाजूने समोर जाण्याकरिता एकमेव मार्ग शिल्लक राहतो. या मार्गावर पादचारी व भक्तमंडळींची नेहमीच वर्दळ असते. मात्र, या मार्गावर खासगी गाड्या पार्किंग केल्या जातात. मंदिराच्या शेजारी दुचाकी, तर मंदिराच्या मागील बाजूस चारचाकी वाहने उभी केली जातात.विशेषत: शुुक्रवारी आठवडा बाजारादिवशी येथून बाजारहाटसाठी जाणाऱ्या महिलांना वाट काढताना बरीच कसरत करावी लागते. गाड्या बाजूला घेणारे व गाड्या लावणारे यांची येथे गर्दी दिसते. मुळातच हा रस्ता अरुंद व त्यातच येथे उभी केलेली वाहने यामुळे येथे प्रचंड अडचण होते. देवस्थान कमिटीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.देवस्थानचा विरोध : कुंभारमंदिराचे पावित्र्य लक्षात घेता हा परिसर स्वच्छ व रिकामा असणे गरजेचे आहे. येथे गाड्या पार्किंगकरिता देवस्थान समितीचा विरोधच आहे. ग्रामपंचायत व पोलीस खात्याने वाहनधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी प्रतिक्रिया देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंदा कुंभार यांनी दिली.पे अँड पार्ककरिता अडचणपे अँड पार्क पद्धत अवलंबायची तर वसुलीकरिता ठेवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार भागवायचा कुणी? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे.