शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सोनगेकरांच्या ग्रामनिधीवर ग्रामसेविकांचा डल्ला डल्लाेनगेकरांच्या ग्रामनिधीवर ग्रामसेविकांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST

तडकाफडकी बदली : सीईओंची कारवाई, माहिती अधिकारातून निष्पन्न दत्ता पाटील म्हाकवे : आर्थिक अडचणी ...

तडकाफडकी बदली : सीईओंची कारवाई, माहिती अधिकारातून निष्पन्न

दत्ता पाटील

म्हाकवे : आर्थिक अडचणी असतानाही गावकरी घरफाळा आणि पाणीपट्टी भरतात. या देवघेवीची जबाबदारी ग्रामसेवकांवर असते. मात्र, सोनगे (ता. कागल) येथील ग्रामसेविका स्मिता जाधव यांनी या निधीवरही डल्ला मारला आहे. एकाच महिन्यात दिवाबत्तीवर १७ हजार, पाणी योजनेच्या लिकेजवर (गळती) वारेमाप खर्च, आठवडाभरात कर्मचाऱ्यांना दोनवेळा बोनस वाटप, आवश्यक साहित्य खरेदीचे धनादेश हे संबंधित दुकानदार, फर्म अथवा कंपनीच्या नावे न काढता ते आपल्याच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नावे काढले आहेत. ग्रामनिधी व नपापु यामध्ये अनेक कारभारात भ्रष्टाचार केला आहे.

माजी उपसरपंच जयसिंग पाटील यांनी माहिती अधिकारातून घेतलेल्या माहितीतून हा सावळागोंधळ निष्पन्न झाला आहे. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल यांनी जाधव यांची करवीर येथे तडकाफडकी बदली केली आहे. वर्षांपूर्वी जाधव या सोनगे येथे हजर झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या यापूर्वीच्या कारभाराबाबत पाटील यांना कुणकुण होती. त्यामुळे त्यांच्या कारभारावर ते लक्ष ठेवून होते. थोडी शंका आल्याने त्यांनी माहिती अधिकारातून माहिती मागितली. यामध्ये त्यांना बराच अनागोंदी कारभार दिसून आला. १९ ऑक्टोबर२० रोजी पं. स.चे विस्तार अधिकारी कुंभार तसेच गटविकास अधिकारी संसारे यांच्याकडे लेखी तक्रार केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीच केली. त्यामुळे २७ ऑक्टोबर रोजी उपमुख्य कार्यकारी अरुण जाधव यांच्याकडे तक्रार केली. मात्र, याबाबत कार्यवाहीचा पत्ताच नाही. त्यामुळे पाटील यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल यांच्याकडे १२ डिसेंबरला दाद मागितली होती.

डॉ. मित्तल यांनी याची गांभीर्याने दखल घेत ग्रामसेविका जाधव यांची तडकाफडकी बदली केली. मात्र, तक्रारदार पाटील हे या कारवाईबाबत समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांनी वरिष्ठांकडे दाद मागण्याचा निर्धार केला आहे.

चौकट-

निलंबन होईपर्यंत पाठपुरावा करणार : पाटील

ग्रामसेवक हा गावाचा रखवालदार असतो. त्यामुळे रखवालदारानेच भ्रष्टाचार करणे ही खेदजनक बाब आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांची तात्काळ बदली केली. मात्र, हा गंभीर प्रकार असून संबंधित ग्रामसेविका निलंबित होईपर्यंत पाठपुरावा करू. तसेच विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागणार असल्याचे जयसिंग पाटील यांनी सांगितले.

दिवाबत्तीवर १७ हजार खर्च कसा?

गावातील केवळ सार्वजनिक खांबांवरील खराब तारा अथवा खांब बदलण्याची जबाबदारी वीज कंपनीची असते. केवळ बल्ब गेला असेल तरच ग्रामपंचायतीने तो बल्ब घालावयाचा असतो. असे असतानाही मार्च २० मध्ये एकाच महिन्यात १७ हजार खर्च दाखविला असल्याचे जयसिंग पाटील यांनी सांगितले.