करवीर तालुक्यातील ५४ गावांची करवीर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात विभागणी होते. या ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून साम, दाम, दंड या त्रिसूत्रीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. ५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून काही गावातील उमेदवार असे ७८ उमेदवार बिनविरोध निवड झाली आहे.
जसजसा निवडणुकीचा दिवस जवळ येऊ लागला आहे तसतसे मतदारांना आमिष दाखविण्याबरोबर धमकावण्याचे प्रकार होऊ लागले आहे. दिवसातून सकाळ, दुपार, संध्याकाळ मतदारांंशी संपर्क साधून काय कल आहे याची चाचपणी करताना दिसत आहेत. यासाठी रात्रीच्या वेळी मतदारांना भेटण्याची वेळ साधताना उमेदवार दिसत आहेत.
प्रचारात महिला आघाडीवर
महिला उमेदवार पुरुषांच्या प्रचारावर अवलंबून न राहता स्वतः घराघरात मतदारापर्यंत पोहचून मतदारांशी संपर्क करत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेत आहेत. यामुळे एरव्ही सायंकाळी टीव्हीसमोर बसणाऱ्या महिलांचे जथ्थेच्या जथ्थे गल्लीत गल्लीत दिसत आहेत.