शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

रेशन कार्डास आधार लिंक न झाल्यास धान्य बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ३१ जानेवारीपर्यंतची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:26 IST

कोल्हापूर : लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींचे शंभर टक्के आधार कार्ड लिंक करणे आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाइल ...

कोल्हापूर : लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींचे शंभर टक्के आधार कार्ड लिंक करणे आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाइल क्रमांक ३१ जानेवारीपूर्वी फिड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या व्यक्तीचे आधार कार्ड लिंक होणार नाही, त्यांचेच फक्त धान्य फेब्रुवारीपासून कार्ड लिंक होईपर्यंत थांबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिली. एका कार्डावर पाच व्यक्ती असतील व त्यातील चौघांचे आधार नंबर लिंक असतील तर त्यांना धान्य मिळेल. ज्यांचे लिंक नसेल तेवढ्याच व्यक्तीला ते दिले जाणार नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.

जिल्ह्यात ५ लाख ६० हजार रेशन कार्ड आहेत. त्यावरून सुमारे २५ लाखांवर लोकांना रेशन धान्याचे वाटप केले जाते. त्यातील ८४ टक्के नागरिकांचे आधार कार्ड यापूर्वीच लिंक करण्यात आले आहेत. उर्वरित १६ टक्के नागरिकांचे राहिले आहेत, त्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. रेशन धान्य संबंधित व्यक्तीलाच मिळावे, त्यातून गैरप्रकार होऊ नयेत, यासाठीच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नियमित धान्य मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांनी धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे आपल्या शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तींचे आधार क्रमांक देण्यात आलेले नाहीत त्यांनी रास्तभाव दुकानदार यांच्याकडे आधार कार्ड घेऊन जावे. तिथे जावून बोटाचे ठसे देऊन फिडींग पूर्ण करावे. हे काम रेशन दुकानातच केले जाणार आहे. त्यासाठी अन्यत्र कुठेही जाण्याची गरज नाही. त्यामध्ये काही अडचणी येत असतील तर संबंधित तहसील कार्यालय, पुरवठा शाखा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.