शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘टोल’ हद्दपार करणारच.. गोविंद पानसरे : बस वाहतूक संघटनेतर्फे सभा

By admin | Updated: May 18, 2014 00:47 IST

कोल्हापूर : मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील, मुख्यमंत्री येऊदेत किंवा कोर्ट सांगू दे; टोलला हद्दपार केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, असा इशारा टोलविरोधी कृती समितीचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी दिला.

कोल्हापूर : मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील, मुख्यमंत्री येऊदेत किंवा कोर्ट सांगू दे; टोलला हद्दपार केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, असा इशारा टोलविरोधी कृती समितीचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी दिला. टोलविरोधी कृती समितीच्या वतीने टोलविरोधात पुन्हा एकदा ९ जून रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून जनजागृती करण्यासाठी आज, शनिवारी महालक्ष्मी चेंबर्स येथे कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेतर्फे टोलविरोधी पहिली सभा घेण्यात आली. त्या सभेत मार्गदर्शन करताना हा निर्धार करण्यात आला. पानसरे म्हणाले, लाकडावर एकदा घाव घालून ते मोडत नाही; तर त्या लाकडावर अनेक वेळेला घाव घालावे लागतात. त्याचप्रमाणे टोलविरोधात अनेक वेळा आंदोलन केल्यानंतरच टोल हद्दपार होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन, जोरदार घाव घालावा; तरच टोल हद्दपार होणार आहे. चंद्रकांत यादव म्हणाले, सरकारला धोरण बदलावे लागेल असे जनआंदोलन आता उसळले पाहिजे. ज्यांची चारचाकी गाडी नाही, तेच या आंदोलनात जास्त आहेत. आता ज्यांची चारचाकी गाडी आहे, त्यांनी पूर्ण ताकदीने आंदोलनात उतरले पाहिजे. दिलीप पवार म्हणाले, सामान्य माणसाला शहरात ये-जा करण्यासाठी टोलमुळे अडचण येत आहे. सामान्य माणसासाठी आम्ही लढणार आहोत, कोणीही येऊ दे; हे आंदोलन आता थांबणार नाही. बाबा इंदुलकर म्हणाले, कायदा आमच्यासाठी आहे. कायद्यासाठी आम्ही नाही. शासनाने कोल्हापुरातून टोलचे भूत काढून टाकावे. वेळीच जागे व्हावे अन्यथा शासनकर्त्यांना सत्तेपासून १० ते १५ वर्षांचा उपवास करावा लागेल. यावेळी महापौर सुनीता राऊत, माजी महापौर वंदना बुचडे, माजी नगरसेविका मनीषा बुचडे, रघुनाथ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले.