शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बस अपघातातील बळींच्या संख्येबाबत सरकारच अनभिज्ञ

By admin | Updated: December 16, 2014 23:49 IST

गेल्या वर्षी राजधानी दिल्लीत स्कूल बसच्या अपघातांमध्ये नेमक्या किती शाळकरी मुलांचा बळी गेला, याची सरकारला माहिती नाही

कुरुंदवाड : येथील श्री स्पोर्टस् क्रीडा संस्थेने आयोजित केलेल्या ४६व्या राज्य व्हॉलिबॉल स्पर्धेत पुरुष-महिला गटांत नागपूरच्या संघांनी दुहेरी मुकुट पटकावत अजिंक्यपदावर नाव कोरले. पुरुष गटात मुंबई उपनगर संघ, तर महिला गटात पुणे संघ उपविजेता ठरला. पुरुष गटानेही जिगरबाज खेळी करीत मुंबई उपनगराला २५-२०, २३-२५, २५-१९, २८-३० व १५-९ अशा सेटनी तीन विरुद्ध २ गुणांनी पराभूत केले. पहिला सेट नागपूर संघाने २५-२० अशा फरकाने जिंकला, तर दुसरा सेट मुंबई संघाने २५-२३ असा जिंकून गुणात बरोबरी साधली. नागपूर संघाने सौरभ लोकरे, नीलेश मते, एस. सहदेव. पी. बाला टंडन व जे. तिवारी यांच्या उत्कृष्ट खेळीने नंतरचे दोनही सेट अत्यंत चिकाटीने जिंकले, तर मुबंई उपनगरच्या कल्पेश पटेल, दिग्विजय पानसरे, दिग्विजय साळुंखे, अंकित चौधरी, जी. भडंगे यांनीही तितक्याच जोराने प्रत्युत्तर दिले. मात्र, नागपूरच्या सांघिक खेळीपुढे मुंबई उपनगरला हार पत्करावी लागली. या अटीतटीच्या लढतीमुळे तब्बल अडीच तासांहून अधिक काळ सामना रंगला. या रंगलेल्या सामन्यामुळे मध्यरात्रीपर्यंतही स्टेडीयममधील एकाही क्रीडाशौकीनाने जागा सोडली नाही. महिला गटातील अंतिम लढतीतही नागपूर विरुद्ध पुणे यांच्या झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत नागपूर संघाने पुणे संघावर २०-२५, २५-१८, २५-१८ व २७-२५ अशा सेटने मात करीत विजय मिळविला. दोन्ही संघांनी प्रत्येक गुणासाठी पाठलाग केल्याने चार सेटवर तब्बल सव्वादोन तास सामना रंगला.पुणे संघाच्या अनिता झाकरीस व अमिता झाकरीस या जुळ्या बहिणींनी सरस कामगिरी केली. त्यांना स्नेहा भगत, प्रियंका धोत्रे, प्रियदर्शनी कोकरे यांनी चांगली साथ दिली. मात्र, नागपूर संघाची नामांकित खेळाडू भाग्यश्री धार्मिक, लिफ्टर दिशा देवाळकर, सिमरन चौधरी यांच्या उत्कृष्ट सांघिक खेळापुढे पुणे संघाला नामोहरम व्हावे लागले. पुणे संघाने पहिला सेट २५-२० फरकाने जिंकला. मात्र, नागपूर संघाने चिवट खेळी करीत सलग तीनही सेट जिंकत विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघांना माजी मंत्री सतेज पाटील, नगराध्यक्ष संजय खोत, मयूर दूध संघाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. (वार्ताहर)