लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : लॉकडाऊन काळातील वीजबिल भरणार नाही. ते सरकारने माफ करावे, अशी मागणी भाकपच्या बैठकीत करण्यात आली. याबाबत २६ जानेवारीनंतर केल्या जाणाऱ्या आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी केले.
लॉकडाऊन काळात कारखान्यांसह सर्व व्यवसाय बंद पडले. त्यावेळी सर्वांचेच आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या काळातील सहा महिन्यांचे वीज बिल सरकारने माफ करावे, या मागणीसाठी पाच हजार अर्ज भरून प्रांत कार्यालयात देण्यात आले आहेत. अनेकवेळा आंदोलने केली, निवेदने दिली, तरी सरकार याकडे लक्ष देत नाही. म्हणून आम्ही वीज बिल भरणार नाही. तसेच नागरिकांनीही ते भरू नये. बैठकीस दत्ता माने, ए. बी. पाटील, शिवगोंडा खोत, आनंदा चव्हाण, भरमा कांबळे, सदा मलाबादे उपस्थित होते.