शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

सरकारने साखर निर्यातीस प्रोत्साहन द्याव

By admin | Updated: December 16, 2014 00:20 IST

जयंत पाटील : निर्यातीवरच चांगला ऊस दर अवलंबून; मतदारसंघात आभार दौरो

इस्लामपूर : पूर्वी साखरेचे दर २४५० वर आल्यावर माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी अनुदान देऊन साखर निर्यातीस प्रोत्साहन दिल्याने दर ३३००-३४०० वर गेले़ त्यामुळे आपणास प्रतिटन २६००-२७०० पर्यंतचा ऊस दर देता आला़ राज्यात भाजप सत्तेवर आहे. त्यांना कामास वेळ द्यायला हवा. मात्र केंद्रातील भाजप सरकारने साखर निर्यातीस प्रोत्साहन दिल्यास साखरेचे दर वाढून चांगला ऊस दर मिळू शकतो, असा विश्वास माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.आमदार पाटील यांनी मतदारसंघात ‘आभार दौरा’ केला. त्यांनी सावळवाडीपासून सुरुवात करून माळवाडी, दुधगावचा दौरा पूर्ण केला़ त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सौ. सुस्मिता जाधव, सौ़ उज्ज्वला पाटील, नायब तहसीलदार एस़ आऱ परब, गटविकास अधिकारी यु. एम़ वाघमोडे, उपअभियंता पी़ के. प्रदीप, शाखा अभियंता प्रमोद मसुटगे होते़ गावा-गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आ़ पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला़ याप्रसंगी त्यांनी विविध विकासकामांवर चर्चा करताना लोकांचे प्रश्नही समजावून घेतले़ या दौऱ्यात आ़ पाटील यांनी मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन केले.आ़ पाटील पुढे म्हणाले की, मला सर्व मतदारांचा अभिमान आहे़ कारण राज्यात इतरत्र बरेच काही घडत असताना आपण कोणतीही तोशिस न लावता मला आपला आशीर्वाद दिला. सध्या आपण सत्तेत नाही. विरोधी बाकावर आहे. कामात थोडेफार मागे-पुढे होईल़ मात्र आपल्या कामांचा पाठपुरावा करून निश्चितपणे प्रश्न मार्गी लावू. अधिवेशनानंतर सर्वच गावांचा आभार दौरा करणार आहे़ मतदारसंघातील गोरगरीब स्वस्त धान्य कार्डधारकांना त्यांच्या हक्काचे धान्य वेळेवर मिळवून देण्यासाठी १० गावांमध्ये एक योजना राबविणार आहे़ प्रथम सर्व कार्डधारकांना धान्य कधी व किती आले, याचा भ्रमणध्वनीवरून संदेश देऊ़ महिन्याच्या शेवटी किती धान्य नेले, किती राहिले, याची माहिती माझ्याकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहे़ नंतर धान्य न उचललेल्या कार्डधारकांना धान्य उचलण्याचा संदेश दिला जाणार आहे. सरपंच सौ. जयश्री काटकर, उपसरपंच दणाणे, ग्रामस्थांनी आ. पाटील यांचा सत्कार केला़ याप्रसंगी सावळवाडीचे माजी सरपंच रवींद्र माणगावे, भालचंद्र पाटील, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, अमोल धोंडे, भाऊसाहेब मगदूम, विलासमती पाटील उपस्थित होते. माळवाडी येथे सरपंच छायाताई जाधव, उपसरपंच मोहन गडगे यांनी त्यांचा सत्कार केला़ तानाजी कोळी यांनी क्षारपड जमिनीचा, काही ग्रामस्थांनी रस्त्याचा प्रश्न मांडला. दुधगाव येथे सरपंच शालिनी कदम, पं. स़ सदस्य प्रमोद आवटी व ग्रामस्थांनी आ़ पाटील यांचा सत्कार केला़ शंकर साळुंखे, बाळासाहेब आडमुठे, शंकर बागडे, प्रमोद म्हेत्रे, बापू महाजन, राजू कोले, अविनाश पाटील, विलास मेणचेकर, राहुल रावळ, विलास आवटी उपस्थित होते़ (वार्ताहर)आ. पाटील यांनी यावेळी दहा गावांसाठी धान्य योजना जाहीर केली. ते म्हणाले की, प्रथम सर्व कार्डधारकांना धान्य कधी व किती आले, याचा संदेश भ्रमणध्वनीवरून देण्यात येईल. महिन्याच्या शेवटी किती धान्य नेले, किती राहिले, याची माहिती माझ्याकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहे़