शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

गांधीमैदानात टोलेबाजी

By admin | Updated: July 27, 2014 00:50 IST

रवी इंगवलेंचा तिकिट न मिळाल्यास वेगळ्या विचाराचा इशारा

कोल्हापूर : राजकारणात न बोलता काट्यानेच काटा काढावा लागतो. आपल्याला जर निवडणूक लढवायची, तर क ोणाला दुखवून चालणार नाही. कामाची धडाडी, संघटन याला संयमाची जोड हवी, असा उपदेशाचा डोस जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, शनिवारी नगरसेवक रविकिरण इंगवले यांना दिला. शिवाजी पेठेतील गांधी मैदानाच्या सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली. या कार्यक्रमात रविकिरण इंगवले यांनी माजी आमदार मालोजीराजे यांचे नाव घेऊन, तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील व नगरसेवक सत्यजित कदम यांचे नाव न घेता कडवट टीका केली. गेल्या महापालिका निवडणुकीत मला उमेदवारी मिळू नये, यासाठी मालोजीराजे व त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांनी टोकाचा विरोध केला. आमदार महादेवराव महाडिक यांच्यामुळेच त्यावेळी तिकीट मिळू शकले. मालोजीराजे यांच्या कर्मामुळेच त्यांचा पराभव झाल्याचा टोला त्यांनी यावेळी हाणला. आपण कोल्हापूर उत्तरमधून राष्ट्रवादी किंवा कॉँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. त्यामुळे मुश्रीफ व महाडिक यांनी आपल्याकडे लक्ष द्यावे. जर का मला तिकीट नाकारले, तर वेगळा विचार करावा लागेल. आमदार कोणाला करायचे व कोणाला पाडायचे एवढी ताकद आपली या मतदारसंघात आहे, असा इशारा इंगवले यांनी दिला. याचा संदर्भ घेत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर उत्तरची जागा कॉँग्रेसकडे आहे. त्यामुळे स्वतंत्र लढायचे झाल्यास नक्कीच विचार केला जाऊ शकेल; परंतु इंगवलेंनी भाषणात नेत्यांवर केलेली टीका चुकीची आहे. विधानसभा निवडणूक लढवायची असेल, तर त्यांनी असे प्रसंग टाळावेत. निवडणुकीत सर्वांना बरोबर घेऊन गेले पाहिजे. असे सुनावले. ‘उत्तर’मध्ये उमेदवारांची गर्दी कोल्हापूर शहरात सध्या इच्छुकांचे जिकडे-तिकडे डिजिटल फलक झळकत आहेत. तो-जो निवडणुकीसाठी इच्छुक आहे. त्यामुळे ‘कोल्हपूर उत्तर’च्या आमदारकीचा प्रश्न आता येथील जनताच सोडवू शकेल, असा टोला मुश्रीफ यांनी हाणला. संभाजी देवणे यांचेही फलक यात असल्याचे सांगून त्यांनी देवणे यांचीही खिल्ली उडविली. त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. धनंजय महाडिकांपुढे ‘धर्मसंकट’ विधानसभा निवडणुकीत मी कागलमध्ये असल्याने कोल्हापूर उत्तरमध्ये आपला काही जास्त संपर्क येणार नाही; परंतु धनंजय महाडिक हे खासदार असल्याने त्यांची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे. कारण लोकसभेत प्रत्येकाने केलेली मदत पाहता महाडिक यांना कुणाच्या मागे उभा राहायचे हे त्यांच्या पुढे धर्मसंकटच आहे, असे मुश्रीफ यांनी हसत-हसतच सांगितले.