शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या चौकशीचे सहकारमंत्र्यांचे संकेत

By admin | Updated: April 13, 2015 00:36 IST

लेखापरीक्षण अहवाल मागविला : प्रकरण गांभीर्याने घेतले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) दीडशे कोटींच्या दरोड्याच्या बातम्या वाचल्या आहेत. सामान्य दूध उत्पादकांशी संबंधित हा व्यवसाय असल्याने आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, लेखापरीक्षणाचा अहवाल मागितला आहे. हलगी वाजवून कोणी दरोडा टाकला, हे येत्या दोन-तीन महिन्यांत दिसेल, असे सांगत सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘गोकुळ’च्या चौकशीचे संकेत दिले आहेत. कोल्हापूर येथे रविवारी शासकीय विश्रामगृहावर निवडक पत्रकारांशी मंत्री पाटील बोलत होते. ‘गोकुळ’ निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कडाडून हल्ला चढविला जात आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या लेखापरीक्षणातील ठपक्यानुसार सत्तारूढ कारभारी मंडळींनी हलगी वाजवून १५० कोटींचा दरोडा घातल्याचा घणाघाती आरोप केला होता. या आरोपाने सामान्य दूध उत्पादकांचे डोळे पांढरे झाले आहेत. याबाबत सहकारमंत्री म्हणून आपली भूमिका काय असणार, असे मंत्री पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘गोकुळ’चा लेखापरीक्षण अहवाल जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव यांच्याकडे मागितला आहे. तो येताच पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. ‘गोकुळ’वर सामान्य दूध उत्पादकाचे जीवन अवलंबून आहे. निवडणुकीतील आरोप -प्रत्यारोपांचा फारशा गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही; पण लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार कोणी आरोप करीत असतील, तर त्याची दखल घ्यावीच लागेल. वृत्तपत्रांतून दरोड्याबाबत सविस्तर वाचले आहे. अहवाल मागितला असून त्यावर काय करतो हे येत्या दोन-तीन महिन्यांत आपणाला समजेल, असे ‘गोकुळ’च्या चौकशीचे संकेत सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, नगरसेवक आर. डी. पाटील, नाथाजी पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)