शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना संधी द्या

By admin | Updated: April 8, 2015 00:27 IST

अशोक भोईटे : शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती समारंभात प्राचार्यांचा गुणगौरव

कोल्हापूर : गुणवत्ता केवळ अभ्यासात मोजली जाऊ नये. विद्यार्थ्यांतील सुप्तगुणांचे प्रभावी प्रकटीकरण होणे म्हणजे गुणवत्ता. ते बलवान नागरिक घडविण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्राचार्य, प्राध्यापकांनी त्यादृष्टीने कार्यरत राहून विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाची संधी विविध उपक्रमांतून उपलब्ध करून द्यावी, शिवाय विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा उपयोग करून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी मंगळवारी येथे केले.येथील केआयटी कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘केआयटी’चे अध्यक्ष सचिन मेनन, तर सचिव साजिद हुदली, विश्वस्त सुनील कुलकर्णी, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.याप्रसंगी शहरी विभागातून डॉ. हिंदुराव पाटील (विवेकानंद महाविद्यालय), कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे (शिवाजी विद्यापीठ), एन. व्ही. नलवडे (न्यू कॉलेज). निमशहरी : पी. व्ही. कडोले (डीकेटीई कॉलेज, इचलकरंजी), एम. एस. शिंदे (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा). ग्रामीण विभाग : व्ही. व्ही. कार्जिनी (केआयटी कॉलेज), एस. वाय. होनगेकर (राजे रामराव महाविद्यालय, जत) यांचा सत्कार करण्यात आला.प्रभारी कुलगुरू डॉ. भोईटे म्हणाले, पुस्तकी शिक्षक हे ५० टक्के काम करते. उर्वरित काम हे व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे. त्यादृष्टीने प्राचार्य, प्राध्यापकांनी कार्यरत राहावे. विद्यार्थ्यांत सामाजिक बांधीलकीची भावना निर्माण करणे शिक्षकांची जबाबदारी आहे. अध्यक्ष मेनन म्हणाले, गुणवत्तेची एकके सध्या बदललेली आहेत. ते लक्षात घेऊन स्पर्धात्मक युगात टिकून राहणारे विद्यार्थी घडविण्यावर अधिक भर देणे काळाची गरज आहे. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते शहरी, निमशहरी, ग्रामीण विभागातील गुणवत्ता शिष्यवृत्तीप्राप्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. रसिका देऊसकर यांनी पसायदान सादर केले. केआयटीचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी यांनी स्वागत केले. प्रा. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. एम. एम. मुजुमदार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)समारंभाचा खर्च विद्यापीठ देणारसत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील म्हणाले, शिष्यवृत्तीत १४ वर्षे विवेकानंद कॉलेज अव्वल आहे. कला, क्रीडा, युवा महोत्सवातही आम्ही आघाडीवर आहोत. पण, आम्हाला कायमस्वरूपी संलग्नता मिळविण्यासाठी ४० वर्षे लागली. मोठ्या महाविद्यालयांना विद्यापीठाची सापत्नभावाची वागणूक मिळते. शिष्यवृत्ती समारंभाचे प्रमाणपत्र मराठीत मिळते; पण ते ‘नॅक’च्या समितीला समजत नाही. त्यामुळे ते मराठी व इंग्रजीत मिळावे. शिष्यवृत्ती समारंभाचा सर्व खर्च आयोजक महाविद्यालय करते. हा खर्च विद्यापीठाने द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. प्राचार्य एस. वाय. होनगेकर म्हणाले, शिष्यवृत्तीबाबत पारंपरिक आणि व्यावसायिक महाविद्यालयांचे स्वतंत्र गट करावेत. त्यावर प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे म्हणाले, या समारंभासाठी महाविद्यालयांना येणारा खर्च विद्यापीठ देईल. प्रमाणपत्र मराठी व इंग्रजी दिले जाईल.