शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानाने जागा द्या, अन्यथा स्वबळावर

By admin | Updated: July 27, 2014 01:09 IST

राजू शेट्टी यांचा शिवसेना-भाजपला इशारा : मोदी लाट कर्नाटक, केरळमध्ये कोठे गेली

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील यश हे केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळाल्याचा कांगावा भाजपची मंडळी करीत आहेत. मग ही लाट कोल्हापूरसह कर्नाटक, केरळमध्ये का दिसली नाही? अशी विचारणा करत सन्मानाने जागा वाटप झाले, तर ठीक अन्यथा ‘स्वाभिमानी’चा झेंडा घेऊन विधानसभा लढवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दिला. करवीर व दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा आज, शनिवारी कोल्हापुरात झाला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत होते. शेट्टी म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी महायुतीच्या बाजूने उभा करण्याची किमया ‘स्वाभिमानी’ने केली आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचे मोल विधानसभेच्या जागांच्या माध्यमातून मागत आहे. सगळेच यश नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाले असे कोणी भ्रमात राहू नये. यामध्ये आमचे योगदान मोठे आहे. जागांबाबत सगळेच मनासारखे होईल, असे नाही. काही जागा सोडाव्या लागतील. पण सन्मानाने चर्चा व्हायला हवी. सदाभाऊ खोत म्हणाले, ‘स्वाभिमानी’ने अजून हत्यार खाली ठेवलेले नाही. महायुती ही आमची मजबुरी समजू नये. ताकदीचे उमेदवार ज्यांच्याकडे त्याप्रमाणे जागा वाटपाची भाषा सुरू आहे. ताकद आहे, म्हणून दाऊद व अरुण गवळी यांना उमेदवारी देणार आहात का? आम्हाला मुख्यमंत्री, मंत्री व्हायचे नाही, जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून महायुतीत आलो आहे. सत्तेसाठी फरफटत मागे येणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी ‘दक्षिण’ मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. काटे यांना अनिल मादनाईक यांनी एक लाख, तर विजय पाटील (रुकडी) यांनी ११ हजार १११ रुपयांचा निवडणूक निधी जाहीर केला. अनिल मादनाईक, प्रा. जालंदर पाटील, उल्हास पाटील, जयकुमार कोल्हे, राजेंद्र गड्ड्याण्णावर, श्रीकांत घाटगे, आदी उपस्थित होते.