शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांना एक महिन्याची सुटी द्या

By admin | Updated: April 2, 2015 00:38 IST

पंचायत समिती सभेत ठराव : वर्ग उघडे असतात, पण विद्यार्थी नसल्यामुळे मागणी

आजरा : इतर शाळांना सुटी असताना अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी नसते. वर्ग उघडे असतात, पण विद्यार्थी नाहीत अशी अवस्था सर्वत्र दिसत असल्याने इतर शाळांप्रमाणे अंगणवाडीच्या वर्गांनाही महिनाभराकरिता उन्हाळी सुटी द्यावी, अशा मागणीचा ठराव आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.आजरा पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी सभापती विष्णुपंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीस माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व माजी आमदार सा. रे. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी सर्फनाला प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेताना प्रकल्पग्रस्तांची दादागिरी व आडमुठी भूमिका प्रकल्प पूर्णत्वास जाण्यातील प्रमुख अडथळा असून, यामुळे वेळोवेळी प्रकल्पाचे काम बंद केले जात असल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला. खोराटवाडी पिकअप शेडचा प्रश्न उपसभापती दीपक देसाई यांनी उपस्थित करून बांधकाम दर्जेदार नसल्याने ते थांबवण्याची सूचना केले.हाजगोळी-कोवाड मार्गावर साकव बांधण्यात आला आहे, पंरतु त्यावरील रस्त्याची उंची वाढवण्याबरोबरच डांबरीकरण करणेही आवश्यक असल्याचे सदस्य तुळशीराम कांबळे व सभापती विष्णुपंत केसरकर यांनी स्पष्ट केले.आजरा शहरातील बचत गटांकरिता बांधण्यात येत असलेल्या ४७ लाख रुपयांच्या व्यापारी संकुलाचे काम रेंगाळले आहे. तीन वर्षे हे काम पूर्णत्वास गेले नसल्याने त्वरित बांधकाम पूर्ततेच्या हालचाली करण्याच्या सूचना करण्यात आल्या.मुंबईकर आजरावासीयांपासून एप्रिल व मे महिन्यांत जादा बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचे एस.टी. आगाराच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी वीज वितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम विभाग शिक्षण विभाग यासह विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.बैठकीस उपसभापती दीपक देसाई, कामिना पाटील, अनिता नाईक, निर्मला व्हनबट्टे, गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)निंगुडगे ग्रामपंचायतीसाठी १८ अर्जआजरा : निंगुडगे (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी १८ अर्ज दाखल झाले आहेत, तर सुळे ग्रामपंचायतीसाठी बुधवारअखेर दोन अर्ज दाखल झाले असून, उर्वरित पाच ग्रामपंचायतींकरिता एकही अर्ज दाखल झालेला नाही.अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी केवळ निंगुडगे व सुळे येथे अनुक्रमे दहा व दोन अर्ज दाखल झाले आहेत. हत्तीवडे, महागोंड, सरोळी, किणे, होनेवाडी ग्रामपंचायतींकरिता एकही अर्ज दाखल झाला नाही. ७ एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, ८ एप्रिल रोजी छाननी, १० एप्रिलला माघार, तर २२ एप्रिलला मतदान होणार आहे.