शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी १६ तास वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 02:29 IST

सतेज पाटील : फेर वाढवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : पाण्याचा फेर लांबणीवर पडल्याने पंचगंगा, दुधगंगा आणि भोगावती खोऱ्यातील उभी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. यासाठी पाण्याचा फेर वाढवून किमान १६ तास वीज द्यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे केली. यावर लवकरच राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.शेतीसाठी उपसा कालावधीमध्ये भारनियमन नसावे व किमान १६ तास वीज उपलब्ध करून द्यावी, या मागणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी ही मागणी केली. जिल्हाधिकारी सैनी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.सध्या दहा दिवसांचा पाणी उपसा कालावधी असून, यामध्येही वारंवार भारनियमन होत आहे. त्यामुळे शेतीला कमी दाबाने पाणी मिळत आहे. १ ते १० मे या दहा दिवसांच्या पाणी उपसा कालावधीतही वारंवार भारनियमन होत असल्याने उपसा चालू असूनही शेतीला पाणी मिळत नाही. शिवाय पाण्याचा फेर लांबणीवर पडल्याने पिके करपू लागली आहेत. त्यातच पाणी उपसाबंदीचा कालावधी आणखी वाढविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी चिंताग्रस्त असून, शेतीला पाणी नसल्याने शेती पिकवायची कशी? अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उभी राहिली आहे. हे चित्र जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणून पंचगंगा, दुधगंगा, भोगावती खोऱ्यांमध्ये उपसाबंदी लागू आहे. मात्र, दहा दिवसांच्या उपसा कालावधीतही शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यामुळे उपसाबंदीबाबत योग्य नियोजन करा, उपसा कालावधीत १६ तास अखंडपणे वीज द्या, उपसा कालावधीचा फेर किमान दोन दिवसांनी वाढवावा, अशी मागणी आबददार सतेज पाटील यांनी यावेळी केली.पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाणी शेतीसाठी देण्याबाबत नियोजन करू, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता युवराज जरग, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)