शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

घाटगे-मंडलिक-घाटगे एकाच व्यासपीठावर

By admin | Updated: December 28, 2016 00:08 IST

संजय मंडलिक : तिघांनी एकत्र यावे या जनमताच्या कौलाचा आदर करणार; करड्याळला कार्यक्रम

सेनापती कापशी : नगरपालिकांच्या निवडणुकीत भ्रष्टाचारमुक्त कारभार व शाश्वत विकासाकडे नेणारे प्रशासन हा आमचा नारा होता. कागल व मुरगूड येथील जनतेने आम्हाला भरभरून मते दिली व घवघवीत यश मिळवून दिले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी संजय घाटगे, समरजितसिंह घाटगे व आम्ही एकत्र यावे हा जनमताचा कौल आहे. त्याचा आदर करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी केले.ते करड्याळ (ता. कागल) येथील ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय घाटगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे होते.समरजितसिंह घाटगे म्हणाले, मी व्यवस्थापनातून मोठा झालो आहे. व्यक्ती मोठी नसते तर व्यवस्थापन मोठं झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कागल नगरपालिकेत नकारात्मक राजकारण फार झाले. याला उत्तर देण्यासाठी सकारात्मक राजकारण पुढे आणणे गरजेचे आहे. कागल तालुक्याच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कागल मोठं झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला अर्जुनवाडा - करड्याळ दरम्यानचा चिकोत्रा नदीवरील पुलाच्या बांधकामास साडेआठ कोटी रुपये मंजूर झाले असून, लवकरच कामास सुरुवात होत आहे. नागणवाडी प्रकल्प मी आता हातात घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करणार, असेही ते म्हणाले.माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत काही चुका झाल्या त्या पाठीमागे सोडून एकमेकांचा आदर ठेऊन विश्वासास कोणताही तडा जाऊ न देता तालुक्याच्या विकासाकरिता एकत्र येण्याची पूर्तता करा. मी मोठा की तू मोठा याचा विचार बाजूला ठेऊन जनमताचा आदर करुया.स्वागत प्रकाश पाटील, प्रास्ताविक आय. डी. कुंभार यांनी केले. आभार उपसरपंच संजय गेंगे यांनी मानले.यावेळी उपसभापती भूषण पाटील, ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, विश्वास कुराडे, शहाजी यादव, राजाभाऊ माळी, दाजी कुंभार, दत्तात्रय वालावलकर, रामचंद्र सांगले, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, सरपंच लक्ष्मी कुंभार, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)नागणवाडी प्रकल्पासाठी खांद्याला खांदा पाणी हे जीवन आहे. पाण्याअभावी चिकोत्रा खोऱ्यातील जनतेची व शेतकऱ्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या परिसराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संजय मंडलिक, संजय घाटगे व समरजितसिंह घाटगे यांनी खांद्याला खांदा लावून पाठपुरावा करणार असल्याची जाहीर भूमिका स्पष्ट केली.