शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

संजय भोसलेंना बडतर्फ करा : शेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:28 IST

कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्यातील खरा ‘मास्टरमाईंड’ संजय भोसलेच आहे, असा माणूस पालिकेच्या सेवेत राहणे घातक असून, त्यांच्यावर तातडीने फौजदारी ...

कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्यातील खरा ‘मास्टरमाईंड’ संजय भोसलेच आहे, असा माणूस पालिकेच्या सेवेत राहणे घातक असून, त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

गेल्या अनेक वर्षांत झालेल्या घरफाळा घोटाळ्याचा खरा सूत्रधार भोसलेच आहे. कर निर्धारक असताना भोसले याने महापालिकेचे कोट्यवधीचे नुकसान होईल असे मोठे फेरफार केले असल्याचा दावा शेटे यांनी केला.

निलंबित अधीक्षक अनिरुद्ध शेटे निर्दोष असताना त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. हा मानसिक धक्का सहन न झाल्यामुळे शेटे आजारी पडले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांची तसेच त्यांच्या परिवाराची नाहक बदनामी झाली. म्हणूनच शेटे यांच्या मृत्यूस जबाबदार म्हणून संजय भोसले याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी केलेली चौकशी अत्यंत पारदर्शक व परिपूर्ण असल्याचे सांगून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता घोटाळ्यात सहभाग असलेल्या संजय भोसले, दिलीप कोळी, शशिकांत पाटील, बापू माने या चौघांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, असे शेटे यांनी म्हटले आहे.

अनिरुध्द शेटे निर्दोष असल्याचा दावा-

घरफाळा घोटाळ्यातील चौदापैकी आठ प्रकरणांची चौकशी झाली. त्यातील पाच प्रकरणांत दिवाकर कारंडेसह संजय भोसले दोषी आहेत; परंतु त्यांनी आपले नाव पद्धतशीरपणे बाजूला काढले होते. अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. अनिरुद्ध शेटे यांना ज्या प्रकरणात दोषी ठरवून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला, त्या प्रकरणात नुकसानच झालेले नसून, अनिरुद्ध शेटे निर्दोष असल्याचे सांगण्यात आले.