लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संपूर्ण जगातील कोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट कर आणि समस्त मानवजातीला गतजीवन जगण्याचा आनंद पूर्ववत मिळू दे, असे साकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी शिर्डीच्या साईचरणी घातले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दोनवेळा शिर्डीमध्ये आलो होतो. परंतु; कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन झाले नव्हते. आज दर्शन झाले, साईबाबांनी धर्म-पंथ, जात-पातीच्या पलीकडे जाऊन मानवजातीच्या उद्धारासाठी केलेले कार्य महान आहे. कोरोना महामारीमुळे माणसा-माणसांतील नातेसंबंध दुरावले असून संपूर्ण जगाचीच ताटातूट झाली आहे.
फोटो ओळी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी शिर्डीच्या साईबाबा दर्शन घेतले. (फोटो-०३१२२०२०-कोल-मुश्रीफ)
- राजाराम लोंढे