शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

कापडाच्या उशिरा रकमेवरील व्याज मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील वस्त्रोद्योग विविध कारणांमुळे अडचणीच्या आरिष्टात सापडला आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांकडून खरेदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील वस्त्रोद्योग विविध कारणांमुळे अडचणीच्या आरिष्टात सापडला आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांकडून खरेदी केलेल्या ‘ग्रे’ कापडाची रक्कम ठरलेल्या मुदतीत द्यावी. परंतु कोणत्याही कारणास्तव रक्कम देण्यास उशिरा होत असल्यास तेवढ्या दिवसांचे व्याज त्या रकमेसोबत द्यावे, अशा मागणीचे निवेदन यंत्रमागधारक जागृती संघटनेच्यावतीने क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांना दिले. व्यापाऱ्यांना वेळेत पेमेंट देण्यास भाग पाडू, असे आश्वासन त्यांनी संघटनेला दिले.

निवेदनात, यंत्रमागावर उत्पादित होणारे ग्रे कापड व्यापाऱ्यांमार्फत देशाच्या विविध कापड बाजारांत विक्री केले जाते. त्यामुळे यंत्रमागधारक विश्वासाने व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करतो. यंत्रमागधारक सध्या तोट्यात उद्योग करत असून, बँकांच्या कर्जाचे ओझे त्यांच्या डोक्यावर आहे. त्यात दिवसेंदिवस उत्पादन खर्चही वाढत आहे. अशा परिस्थितीत यंत्रमागधारकाला सुताचे पेमेंट देण्यास उशीर झाल्यास त्याला व्यापाऱ्यांना व्याज द्यावे लागते. त्यामुळे उद्योगच कोलमडून व्यापार बंद पडेल, अशी परिस्थिती येऊ नये, यासाठी प्रत्येकाने योग्य व्यापारनीतीचा अवलंब करावा. तसेच सर्व अडत व्यापाऱ्यांनी कापडाच्या उशिरा रकमेवरील व्याज मिळावे, याची त्वरित अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष विनय महाजन, सूरज दुबे, प्रवीण कदम, अशोक बुगड, सचिन मांगलेकर आदींचा समावेश होता.

फोटो ओळी

१५०६२०२१-आयसीएच-०१

कापडाच्या उशिरा रकमेवरील व्याज मिळावे, अशा मागणीचे निवेदन यंत्रमागधारक जागृती संघटनेने क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनला दिले.