शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचे नियमित लसीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोविड संसर्गाच्या भीतीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे किंवा खासगी दवाखान्यात नियमित लसीकरण करण्यास पालक टाळाटाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोविड संसर्गाच्या भीतीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे किंवा खासगी दवाखान्यात नियमित लसीकरण करण्यास पालक टाळाटाळ करत आहेत. मात्र, पावसाळ्यात होणारे संसर्ग व कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता, बालकांचे नियमित लसीकरण करावे, असे आवाहन टास्क फोर्सने पालकांना केले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत नियमित लसीकरणासाठी बालकांना घेऊन दवाखाना किंवा लसीकरण केंद्रावर जाण्याबाबत पालकांच्यात मनात भीती असल्याचे निदर्शनास आले. त्यात लॉकडाऊनमुळे प्रवासाच्या अडचणी आदींमुळे नियमित लसीकरणासाठी टाळाटाळ केली जाते. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येते. पावसाळ्यामधील येणारे आजार तसेच कोराेनाची संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांमध्ये माेठ्या प्रमाणावर संक्रमणाची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बालकांचे नियमित लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

विविध कारणांमुळे राहिलेला लसीकरणाचा डोस देण्यासाठी व अधिक माहितीसाठी पालकांनी त्यांच्या कौटुंबिक डॅाक्टरांना, बालरोगतज्ज्ञाकडे, नजिकच्या शासकीय, महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर संपर्क करावा व आपल्या पाल्यांना सुरक्षित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव व कोविडसाठी गठित बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने करण्यात आले आहे.