शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी तरुणास जन्मठेप

By admin | Updated: January 17, 2016 00:57 IST

आईसह एक महिला निर्दोष : आईनेच दिली होती मुलाची सुपारी

 कोल्हापूर : सुपारी घेऊन अमर वसंत म्हाकवेकर (वय २७, रा. राजेबागस्वार दर्गा, टाऊन हॉलजवळ) याचा खून केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डी. बोचे यांनी शनिवारी गुन्ह्यातील मुख्य आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अमर तानाजी लोखंडे (२४, रा. साळुंखे पार्क, राजारामपुरी) असे त्याचे नाव आहे. मृत अमरची आई सुशीला वसंत म्हाकवेकर (५२), रोशनबी कलंदर मुजावर (भाभी) (३७, रा. शनिवार पेठ) यांनी लोखंडे याला खून करण्यासाठी सुपारी दिली होती. मात्र, आई सुशीला व भाभी रोशनबी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अधिक माहिती अशी, रोशनबी भाभी ही अमरला त्याच्या घरी आलेली आवडत नसे. त्यामुळे ती त्याच्यावर चिडून होती. त्यानंतर या तिघांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला. आरोपी अमर लोखंडे याने १५ जून २०१३ रोजीच्या रात्री दारूमध्ये गोळ्या घालून टाऊन हॉल येथील पिकअप शेडमध्ये गळा आवळून अमर म्हाकवेकर याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी लोखंडे याला अटक करून चौकशी केली असता त्याने अमरचा खून करण्यासाठी त्याच्या आईने व भाभीने आपणाला २० हजार रुपयांची सुपारी दिली होती, अशी कबुली दिली. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी लोखंडेसह सुशीला म्हाकवेकर, रोशनबी मुजावर यांना अटक केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक पी. डी. पोमण यांनी याप्रकरणी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या घटनेमध्ये प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. संपूर्ण खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता. सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. घटनेदरम्यान शहरात फिरस्त्यांच्या खुनांचे सत्र सुरू होते. त्यामुळे रात्री पोलीस बंदोबस्त होता. कॉन्स्टेबल साजीद शिकलगार यांनी मृत अमर म्हाकवेकर व आरोपी लोखंडे यांना एकत्र पाहिले होते. तसेच महापालिका येथील बिर्याणी गाडीवाला महंमद गौस जहॉँगीर बेग, रिक्षाचालक महंमद काशीम शेख यांनी दोघांना एकत्र पाहिले होते. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला रुमाल ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील कोंडाळ्यात रिक्षातून जाताना टाकल्याचे पाहिले होते. पंच साक्षीदार बाळासो रामचंद्र पाटील, इब्राहिम दादू कस्ती, तहसीलदार अनंत गुरव, आदींच्या साक्षी व सरकारी वकील एन. बी. आयरेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी तानाजी लोखंडे याला जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)