शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गॅसचे अनुदान आता बँक खात्यावरच

By admin | Updated: December 27, 2014 00:19 IST

नवीन वर्षात अंमलबजावणी : कागदपत्रांची पूर्तता करण्यास तीन महिन्यांची मुदत

कोल्हापूर : घरगुती अनुदानित वापराच्या गॅस सिलिंडरचा योग्य वापर व्हावा आणि पात्र लाभार्थ्यांनाच अनुदान मिळावे, या उद्देशाने जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यातील बीपीसीएल, एचपीसी आणि आयओसी या गॅस कंपन्यांच्या ग्राहकांना अनुदानाची रक्कम त्यांच्या बॅँक खात्यावर जमा केली जाणार असून, त्यासंबंधीचे परिपत्रक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास नुकतेच आले आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता गॅस ग्राहकांना आवश्यक ती कागदपत्रे गॅस एजन्सीकडे द्यावी लागणार आहेत.जानेवारी महिन्यापासून थेट ग्राहकाच्या बॅँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याने आणि आता यामध्ये पुढे कोणताही बदल करण्यात येणार नसल्याने त्यासाठीची आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करणे अपरिहार्य झाले आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता तीन महिन्यांची मुदत दिली आहे. जे पूर्तता करणार नाहीत, त्यांना सवलतीच्या दरात सिलिंडर मिळणार नाही. नवी पद्धत सुरू झाल्यानंतर घरगुती वापराचे सिलिंडर अन्य कारणांसाठी वापरता येणार नाहीत आणि कोणी वापरलेच, तर विना अनुदानित सिलिंडर घ्यावे लागणार आहे.काँग्रेस आघाडी सरकारने गॅस सिलिंडरचे अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आधारकार्डचा गोंधळ असल्यामुळे या खात्यांचे लिंकिंग करण्यात अनेक अडचणी आल्या. जिल्ह्यातील २५ टक्के गॅस ग्राहकांचे बॅँकेशी लिंकिंग झाले होते. यापैकी काही खात्यांवर अनुदानाची रक्कमही जमा झाली. काहींच्या खात्यांवर लिंकिंग होऊनही अनुदान जमा झाले नव्हते. एकंदरीत या योजनेबाबत गोंधळ सुरू होता. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन काँग्रेस सरकारने ही योजना थांबविली.योजनेच्या माहितीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात जनजागृती करण्यात आली आहे. काही कंपन्यांनी मोबाईलवरून एसएमएसद्वारे याबाबत ग्राहकांना माहिती दिली आहे. योजनेमध्ये काही बदल करण्यात आले असून, आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. आधारकार्डशिवाय निव्वळ बँक खात्यावरसुद्धा हे अनुदान ग्राहकांना मिळू शकेल. या प्रक्रियेसाठी दोन फॉर्म असणार आहेत. पहिला फॉर्म हा आधारकार्डचा, तर दुसरा बॅँक खात्याचा असून, फॉर्म भरून बॅँकेत जाऊन त्या ठिकाणी नोंद करून पुन्हा ते संबंधित गॅस एजन्सीमध्ये जमा करायचे आहेत. त्यानंतरच आपले बॅँक खाते लिंक होणार आहे. (प्रतिनिधी)