शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड

By admin | Updated: May 3, 2015 01:14 IST

दहा लाखांचा मुद्देमाल जप्त : गुजरीत सराफाच्या दुकानावर टाकणार होते दरोडा

कोल्हापूर : गुजरी येथील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी जाणाऱ्या चौघाजणांच्या टोळीला जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. संशयित अरुण अंकुश गुंजाळ (वय २४) , रोहिदास देवराव गुंजाळ (२२, बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर), तानाजी भरत रिकोळी (३०, रा. गोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर ), अर्जुन रामा रिकोळी (४२ रा. लवूळ, ता. माढा, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून स्कॉर्पिओ, लोखंडी कटावणी, कोयता, गज, नायलॉनची दोरी व मिरची पूड, चार मोबाईल असा सुमारे दहा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. याबाबत पोलिसांनी सांगितले, जुना राजवाडा पोलीस शुक्रवारी मध्यरात्री गस्त घालत असताना ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसरात त्यांना संशयास्पद स्कॉर्पिओ थांबलेली आढळली. यावेळी गाडीजवळ जाऊन पाहिले असता आतमध्ये चौघेजण बसून होते. गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये दरोडा घालण्याचे साहित्य मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुजरी पेठ येथील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी जात असल्याचे सांगितले. ते कोणत्या सराफाच्या दुकानावर दरोडा टाकणार होते, त्यांना कोणी माहिती दिली होती, यासह अन्य कुठे दरोडे टाकले आहेत, याची चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)