शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडीतील गायकवाड गटाचे शेट्टींना बळ-माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 16:01 IST

शाहूवाडीतील गायकवाड गटाची ताकद हातकणंगलेतील काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या मागे राहील, अशी ग्वाही काँग्रेसच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांनी

ठळक मुद्देकाँग्रेस कमिटीत गायकवाड-शेट्टी भेट

कोल्हापूर: शाहूवाडीतील गायकवाड गटाची ताकद हातकणंगलेतील काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या मागे राहील, अशी ग्वाही काँग्रेसच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांनी दिली. या आठवड्यातच शाहूवाडीमध्ये संयुक्त मेळावा घेउन कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रीय होण्याच्या सुचना दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गुरुवारी दुपारी खासदार राजू शेट्टी व जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्यात शाहूवाडीतील पाठींब्याच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. याला स्वत: संजीवनीदेवी यांच्यासह कर्णसिह व योगीराज गायकवाड यांच्यासह शाहूवाडीतील प्रमुख कार्यकर्ते  उपस्थित होते. 

यावेळी खासदार शेट्टी यांनी शाहूवाडी तालुक्यात खासदार फंडातून केलेल्या विकासकामांचा आढावा घेउन येणाऱ्या निवडणूकीत पाठीशी राहा असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनीही मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करत परिवर्तनाची गरज व्यक्त केली. सर्व मतभेद विसरुन महाआघाडीचे उमेदवार म्हणून शेट्टी यांना मदत करा असे आवाहनही आवाडे यांनी केले. महादेवराव पाटील, सुभाष इनामदार, पंडीत नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मानसिंग गायकवाड गटाची भूमिका सोमवारी ठरणारशाहूवाडीतील गायकवाड गटातील एक असलेले संग्रामसिंह गायकवाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.  संग्रामसिंहांच्या रुपाने गायकवाड गटात कांहीशी विभागणी झाली असलीतरी कर्णसिंह गायकवाड यांच्याबरोबरच आता मानसिंग गायकवाड देखील आपली ताकद खासदार शेट्टी यांच्याच मागे उभे करणार असल्याचे सध्याचे तालुक्यातील चित्र आहे. येत्या सोमवारी (८) मेळावा घेउन पाठींब्याची अधिकृत घोषणा होणार आहे. दरम्यान याच दिवशी जनसुराज्यही भूमिका जाहीर करणार आहे. कार्यकर्त्यातून शिवसेनेला होणाऱ्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर विनय कोरेही महाआघाडीसोबत सकारात्मक असल्याच्या चर्चा आहेत. कार्यकर्त्यांमार्फत तसे संदेशही पाठवले जात आहेत. 

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक