शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा, चंदगड, आजऱ्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. गगनबावडा, चंदगड व आजऱ्यात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक पाऊस ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. गगनबावडा, चंदगड व आजऱ्यात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक पाऊस ९६.४ मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात दोन फुटाने वाढ झाली.

मंगळवारी सायंकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काहीसा जोर धरला. रात्रभर पावसाची रिपरिप राहिली. मात्र, बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढत गेला. सकाळी तर गगनबावडा, चंदगड, आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत धुवाधार पाऊस झाला. इतर तालुक्यातही जोरदार सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहरातही सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पावसाचा जोर राहिला. त्यानंतर काहीकाळ पावसाने उघडीप दिली. दुपारनंतर पुन्हा जोरदार सरी कोसळण्यास सुुरुवात झाली. जिल्ह्यातही दिवसभर जोरदार पाऊस सुरू राहिल्याने नदी, ओढ्यांना पाणी वाढले आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी, तुळशी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाटगाव, चित्री धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, बुधवारी पंचगंगेची पातळी १५ फुटांपर्यंत पोहचली होती. विशेष म्हणजे बुधवारी दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत दोन फुटाने वाढ झाली. पंचगंगा नदीपात्राच्या काठावरील मंदिरे सायंकाळी पाण्याखाली गेली.

तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा-

हातकणंगले (२०.४), शिरोळ (२५), पन्हाळा (२४.२), शाहूवाडी (१६.६), राधानगरी (४१.४), गगनबावडा (९६.४), करवीर (२८.४), कागल (४७.५), गडहिंग्लज (६०.५), भुदरगड (४४.८), आजरा (७३), चंदगड (६८).

आजऱ्यात जनावरांच्या गोठ्याची पडझड

मलिग्रे (ता. आजरा) येथील कृष्णा भैरू बुगडे यांच्या जनावराच्या गोठ्याची पडझड झाली. यामध्ये चार हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

‘घटप्रभा’ धरण भरले

चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणात पाणीसाठा गतवर्षीपेक्षा अधिक होता. त्यात गेली दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी ११३ मिलीमीटर पाऊस झाला. या धरणाची क्षमता १.५४५ टीएमसी आहे.