शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज’चे नेतृत्व ग्रामपंचायतीतूनच घडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST

राम मगदूम लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : ग्रामपंचायत सदस्याला कोण विचारतो? असे एरव्ही म्हटले जाते. परंतु, याच ग्रामपंचायत सदस्यांमधून ...

राम मगदूम

लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज : ग्रामपंचायत सदस्याला कोण विचारतो? असे एरव्ही म्हटले जाते. परंतु, याच ग्रामपंचायत सदस्यांमधून विधानसभेचे सभापती, मंत्री, आमदार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती-उपसभापती होण्याची संधी गडहिंग्लज तालुक्यातील नेत्यांना मिळाली. यातून त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप तालुक्यात, जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही पाडली.

गडहिंग्लज पंचायत समितीचे पहिले सभापती शिवगोंडराव पाटील हे महागावचे सरपंच होते. त्यांचे चिरंजीव ग्रामपंचायत सदस्य विजयराव पाटील, औरनाळचे सरपंच सतीश पाटील, कडलगेचे सरपंच बाबासाहेब पाटील, औरनाळचे सरपंच आप्पासाहेब पाटील, हरळी बुद्रुकचे सरपंच हिंदूराव नौकुडकर, बटकणंगलेचे सरपंच दीपक जाधव, हसूरचंपूच्या सरपंच जयश्री तेली, नूलचे ग्रामपंचायत सदस्य इकबाल काझी यांना सभापतीपदाचा बहुमान मिळाला. कडगावचे सरपंच नागाप्पाण्णा बटकडली यांना पाचवेळा जिल्हा परिषद सदस्य व उपसभापतीपदाचा बहुमान मिळाला. शिप्पूरचे सरपंच आनंदा मटकर, तेरणीचे सरपंच अरूण देसाई, भडगावच्या सरपंच श्रीया कोणकेरी, दयानंद पट्टणकुडी, हनिमनाळचे तानाजी कांबळेंना उपसभापतीपदाची संधी मिळाली. महागावचे सरपंच अप्पी पाटील यांना उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, गडहिंग्लज कारखान्याचे संचालक व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. हणमंतराव पाटील यांना जिल्हा परिषद सदस्य व कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. औरनाळचे सरपंच मलगोंडा पाटील व बसर्गेचे सरपंच चंद्रशेखर पाटील हे जिल्हा परिषद सदस्य झाले. भडगावचे सरपंच शिवाजी पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तर रामाप्पा करिगार यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष, कारखाना संचालक व राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. नेसरीचे सरपंच महादेव साखरे यांना वीरशैव बँकेचे अध्यक्षपद मिळाले. हेमंत कोलेकर यांना जिल्हा परिषद सदस्य, कारखाना संचालक व भाजप तालुकाध्यक्षपद तर जोतिबा भिकले यांना उपसभापतीपद मिळाले. दुंडगेचे सरपंच बाबूराव मदकरींना गडहिंग्लज कारखान्याचे संचालकपद, बाजार समितीच्या सभापतीपदाची तर उदयकुमार देसाई यांना जनता बझारचे उपाध्यक्षपद, तम्माण्णा पाटील यांना तालुका संघाचे अध्यक्षपद मिळाले. मुगळीचे सरपंच सोमगोंडा आरबोळे यांना संकेश्वर कारखान्याचे संचालकपद तर त्यांचे बंधू रमेश आरबोळे यांना गडहिंग्लज कारखान्याच्या संचालकपदाची संधी मिळाली.

............

कानडेवाडीचे सरपंच ते विधानसभा सभापती

कानडेवाडीचे सरपंच बाबासाहेब कुपेकर यांना जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेस व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, चारवेळा आमदार, मंत्री, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष, विधानसभा सभापतीपदाची संधी मिळाली.

............

हत्तरकींनीही मिळवले यश

हलकर्णी ग्रामपंचायतीचे सदस्य राजकुमार हत्तरकी यांना जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा बँकेचे संचालक, वीरशैव बँक व ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची संधी मिळाली.

...............

सतीश पाटील यांना उपाध्यक्षपदी संधी

गिजवणेचे उपसरपंच सतीश पाटील यांना पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, गडहिंग्लज साखर कारखाना संचालक, गडहिंग्लज अर्बन बँकेचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली.