शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांचाही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:20 IST

गडहिंग्लज : शेतकऱ्यांच्या देशव्यापी भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला. त्यामुळे आज, मंगळवारी अत्यावश्यक सेवा ...

गडहिंग्लज :

शेतकऱ्यांच्या देशव्यापी भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला. त्यामुळे आज, मंगळवारी अत्यावश्यक सेवा वगळून गडहिंग्लज शहरातील सर्व दुकाने दिवसभर बंद राहणार आहेत.

गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. उपनगराध्यक्ष महेश कोरी, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. कोरी म्हणाल्या, देशच विकायला काढल्यासारखी परिस्थिती सध्या दिसत आहे. केंद्राच्या जनहितविरोधी कायदे व धोरणामुळे सर्वच घटकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.

यावेळी हॉटेल व परमीट रूमचे अध्यक्ष अवधूत पाटील, बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद किनाती, नाभिक संघटनेचे संदीप झेंडे, टेलर असोसिएशनचे युनूस नाईकवाडे, कापड व्यापारी संघटनेचे प्रवीण पावले, सराफ असोसिएशनचे श्रीनिवास वेर्णेकर, पानपट्टी व्यापारी संघटनेचे भैरू गंधवाले, मेडिकल असोसिएशनचे संदीप मिसाळ, किराणा भुसार व्यापारी संघटनेचे राजेंद्र बस्ताडे, शेती सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष रवींद्र घेज्जी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

------------------------

* गडहिंग्लजमध्ये कडकडीत बंद

रविवारी (दि. ६) भाजप वगळता सर्व पक्ष संघटनांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज, मंगळवारी गडहिंग्लज शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळला जाणार आहे.

------------------------

* फोटो ओळी : गडहिंग्लज येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी मार्गदर्शन केले. शेजारी रवींद्र घेज्जी, युनूस नाईकवाडे, संदीप झेंडे, मुकुंद किनाती, अवधूत पाटील, राजेंद्र बस्ताडे उपस्थित होते.

क्रमांक : ०७१२२०२०-गड-०९