शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

गडहिंग्लजमध्ये दिग्गज पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:24 IST

राम मगदूम गडहिंग्लज : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींसह ३ जिल्हा परिषद सदस्य आणि ५ पंचायत ...

राम मगदूम

गडहिंग्लज : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींसह ३ जिल्हा परिषद सदस्य आणि ५ पंचायत समिती सदस्यांच्या गावांत ग्रामपंचायतीचे मैदान रंगणार आहे. एकूण ५ पैकी ३ जि. प. सदस्यांच्या, तर एकूण १० पैकी ५ पं. स. सदस्यांच्या गावांची ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात दिग्गज पदाधिकारी व सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या गिजवणे, जि. प. सदस्या रेखाताई हत्तरकी यांच्या हलकर्णी, तर अनिता चौगुले यांच्या औरनाळ गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. पंचायत समितीच्या सभापती रूपाली गौतम कांबळे यांचे सासर तेरणी आणि माहेर हरळी बुद्रुक, तर उपसभापती ईराप्पा हसुरी यांच्या खणदाळ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. माजी सभापती जयश्री तेली यांच्या हसूरचंपूची, माजी उपसभापती बनश्री चौगुले यांच्या माद्याळची व पंचायत समिती सदस्या इंदू नाईक यांच्या हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. -------------------------------------

जिल्हा परिषद सदस्य, मतदारसंघ आणि मतदारसंघातील निवडणूक लागलेल्या गावांची संख्या कंसात...

* जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील - गिजवणे (७),

हेमंत कोलेकर - नेसरी (१३),

राणी खमलेट्टी - भडगाव (७),

रेखाताई हत्तरकी - हलकर्णी (१३),

अनिता चौगुले- बड्याचीवाडी (१०)

-------------------------------------

* पंचायत समिती सदस्य व त्यांच्या मतदारसंघातील निवडणूक लागलेल्या गावांची संख्या कंसात

* विठ्ठल पाटील - कडगाव (३),

प्रकाश पाटील - गिजवणे (४),

विजय पाटील - महागाव (४),

श्रीया कोणकेरी - भडगाव (३),

जयश्री तेली - बड्याचीवाडी (५),

बनश्री चौगुले - नूल (५),

विद्याधर गुरबे - नेसरी (३),

इंदू नाईक - बुगडीकट्टी (१०),

रूपाली कांबळे - हलकर्णी (९),

ईराप्पा हसुरी - बसर्गे (४)

-------------------------------------

* कोलेकर-हत्तरकींची कसोटी

जि. प. सदस्य हेमंत कोलेकर यांच्या नेसरी मतदारसंघातील १३ व रेखाताई हत्तरकी यांच्या हलकर्णी मतदारसंघातील १३ गावांची निवडणूक लागली आहे.