शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज’मध्ये ‘राष्ट्रवादी’त रस्सीखेच !

By admin | Updated: April 20, 2015 00:12 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : संतोष पाटील, सतीश पाटील की जयकुमार मुन्नोळी ?

राम मगदूम - गडहिंग्लज -जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यात ‘राष्ट्रवादी’मध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष टी. आर. पाटील यांचे सुपुत्र संतोष पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पाटील की, जिल्हा परिषदेचे सदस्य जयकुमार मुन्नोळी यापैकी कोण बाजी मारणार याकडेच तालुक्याचे लक्ष लागले आहे.तालुक्यात सेवा संस्था गटात १०७ मतदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४३ ठरावधारक राष्ट्रवादीकडेच आहेत. शक्तिप्रदर्शनासाठी प्रत्येकाने समर्थक ठरावधारक आपल्यासोबत ठेवले आहेत. खात्रीच्या विजयामुळे पक्षाच्या उमदेवारीसाठीच त्यांच्यात चढाओढ सुरू आहे. पूर्वभागातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते व बँकेचे माजी अध्यक्ष कडलगेकर पाटलांनी आपला मुलगा संतोषसाठी आग्रह धरला आहे. त्याला जिल्हा परिषदेची उमेदवारी डावलण्यात आल्यामुळे बँकेची उमेदवारी कोणत्याही परिस्थितीत मिळविण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या वाटचालीत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला असून, आमदार मुश्रीफ यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध आहेत. संध्यादेवींचा आशीर्वाद मिळाल्यास उमेदवारी मिळू शकते, असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेल्या गडहिंग्लज तालुक्यातील ‘कौलगे-कडगाव’ जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख युवक कार्यकर्ते सतीश पाटील यांनीही उमेदवारी मागितली आहे. मुश्रीफ यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. अन्य पक्ष-गटांशी त्यांचेही चांगले संबंध आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेचे सदस्य जयकुमार मुन्नोळी व शिवप्रसाद तेली यांनीही उमेदवारी मागितली असून, त्यापैकी मुन्नोळी यांचे नाव ठळक चर्चेत आहे. स्व. कुपेकर व संध्यादेवींच्या पाठीशी तेदेखील ठामपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांचा उमेदवारीसाठी आग्रह आहे. तिघा ‘निष्ठावंतां’तून एकाची निवड करताना नेत्यांची ‘कसोटी’ लागणार आहे.प्रकाश चव्हाणांनाही उमेदवारी ?ंगडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनीही सेवा संस्था व औद्योगिक प्रक्रिया गटातून अर्ज भरला आहे. अलीकडील राजकारणात तेदेखील मुश्रीफ व कुपेकरांच्या पाठीशी राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या वाटणीच्या गडहिंग्लजला हक्काच्या दोन जागा आहेत. बँकेचे माजी संचालक भैयासाहेब हे अलीकडे राष्ट्रवादीपासून दूर आहेत. त्यांच्या जागी चव्हाण यांना उमेदवारी मिळू शकते.विरोधकांच्या हालचालींवर लक्ष!जिल्हा बँक निवडणुकीत गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात श्रीपतराव शिंदे, प्रकाश शहापूरकर व बाळासाहेब कुपेकर यांच्यासह काँग्रेसमधील काही गट एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यांच्यातर्फे संग्रामसिंह कुपेकर यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. त्यामुळे तोडीस तोड उमेदवार देण्याच्या दृष्टीने विरोधकांच्या हालचालीवर ‘राष्ट्रवादी’चे लक्ष आहे.