शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज’मध्ये आता शह-काटशह!

By admin | Updated: December 24, 2014 22:43 IST

कारण-राजकारण : गडहिंग्लज पालिकेत सभापती निवडीचा वाद

राम मगदूम - गडहिंग्लज -विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या निमित्ताने गडहिंग्लज नगरपालिकेत आता शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सभापतिपदाच्या दोन उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे छाननीतच अवैध ठरवून विरोधकांनी बाजी मारली.त्यानंतर आणखी एका समितीच्या सभापतीची निवड अवैध ठरविण्यासाठी विरोधकांनी, तर या निवडीत पीठासन अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयास स्थगिती मिळविण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नगरपालिका संचालकांकडे धाव घेतली आहे.तीन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत तत्कलीन जनता दल-जनसुराज्य-काँगे्रस आघाडीचा पाडाव करून राष्ट्रवादीने पालिकेची सत्ता हस्तगत केली. १७ पैकी राष्ट्रवादीला नऊ, तर विरोधी जनता दल-जनसुराज्य -काँगे्रस आघाडीला आठ जागा मिळाल्या. काठावरील बहुमत आणि आक्रमक विरोधकांमुळे नेहमी एकमेकांना कोंडीत पकडण्याचे प्रकार सुरू आहेत.विषय समित्यांच्या निवडणुकीत एका सदस्याने दोन समित्यांच्या सभापतिपदाच्या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रावर अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्यामुळे पीठासन अधिकाऱ्यांनी बांधकाम व वाचनालय समिती सभापतिपदाच्या उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे बेकायदेशीररीत्या अवैध ठरवून रद्द केलेल्या सभापती निवडी जाहीर कराव्यात, अशी मागणी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अपिलातून केली आहे.या निवडणुकीत एका सदस्याला दोन समित्यांच्या सभापतिपदाच्या उमेदवारांचे सूचक किंवा अनुमोदक होता येत नसल्यामुळे बांधकाम व वाचनालय समिती सभापतिपदाच्या उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरवून पीठासन अधिकाऱ्यांनी दोनही सभापतींच्या निवडी रद्द केल्या. याच नियमानुसार महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी सुंदराबाई बिलावर यांची झालेली बेकायदेशीर निवड रद्द करावी, अशी मागणी विरोधी जनता दल-जनसुराज्य व काँगे्रस आघाडीच्या नगरसेवकांनी अपिलातून केली आहे.राष्ट्रवादी आघाडीची अधिकृत नोंदणी झालेली नसल्यामुळे रामदास कुराडे हे सभागृहातील अधिकृत गटनेते नाहीत. त्यामुळे त्यांनी विषय समित्यांच्या निवडीत शिफारस केलेल्या सदस्यांची नावे अवैध ठरवावीत, अशी मागणीदेखील विरोधकांनी अपिलातून केली आहे.बांधकाम व नगरविकास समिती सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या मतदानात दोन उमेदवारांच्या नावातील रेषेवर मत नोंदविण्यात आलेली शंकास्पद मतपत्रिका रद्द करावी, अशी मागणी जनसुराज्यचे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांनी अपिलातून केली आहे.सत्ताधारी व विरोधकांच्या अपिलांचा निर्णय कांहीही लागला तरी या अपिलांच्या पाठीमागे शह-काटशहाचेच राजकारण असल्याचेच स्पष्ट झाले आहे. सत्ताधाऱ्यांची मागणीबांधकाम व वाचनालय समिती सभापती निवडीत पीठासन अधिकाऱ्यांनी दिलेला चुकीचा निर्णय रद्द करून त्या दोनही समित्यांच्या सभापतींची निवड जाहीर करावी.विरोधकांच्या मागण्याबांधकाम व वाचनालय समिती सभापती निवडीतील निर्णयानुसार महिला व बालकल्याण सभापतींची निवड रद्द करावी.राष्ट्रवादी आघाडीची अधिकृत नोंदणी न झाल्यामुळे गटनेते रामदास कुराडे यांनी शिफारस केलेल्या सर्व समिती सदस्यांची नांवे अवैध ठरवावीत.