शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज कारखान्याने ‘ब्रिस्क'ला २४ कोटी ६५ लाख द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने ‘ब्रिस्क' फॅसिलिटीज कंपनीला २४ कोटी ६५ लाख रुपये द्यावेत, असा ...

गडहिंग्लज :

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने ‘ब्रिस्क' फॅसिलिटीज कंपनीला २४ कोटी ६५ लाख रुपये द्यावेत, असा आदेश सहकार खात्याचे अतिरिक्त सचिव अरविंदकुमार यांनी दिला आहे. आदेशापासून तीन महिन्यात म्हणजेच २१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ही रक्कम द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

२०१४ पासून 'ब्रिस्क'ने सहयोग तत्त्वावर १० वर्षांसाठी हा कारखाना चालवायला घेतला होता. परंतु, मुदतीपूर्वीच यावर्षी हंगामाच्या अखेरीस यापुढे कारखाना चालविणार नसल्याचे कंपनीने शासनाला कळविले होते. त्यानुसार सहकार विभागाच्या समितीने ९ एप्रिलला हा कारखाना कंपनीकडून संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे.

दरम्यान, कंपनी व कारखाना यांच्यातील येणी-देणीसंदर्भात अरविंदकुमार यांच्यासमोरच सुनावणी झाली होती. त्याबाबतचा त्यांनी हा आदेश दिला आहे. साखर आयुक्तांनी ही रक्कम कारखान्याकडून वसूल करून कंपनीला द्यावयाची आहे.

मुदतीत रक्कम न दिल्यास कारखान्याने कंपनीला ८ टक्के व्याज द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. कारखाना चालविण्यास संचालक मंडळ असमर्थ ठरल्यास कारखाना चालवायला घेणाऱ्या कंपनीने 'ब्रिस्क'च्या देय रक्कमेची पूर्तता करावी, अशी अटदेखील आदेशात घालण्यात आली आहे.

-------------------------

* कारखान्याने कंपनीला द्यावयाची रक्कम

कंपनी व कारखाना दरम्यानच्या करारात सभासदांना १० किलो साखर देण्याचे नमूद होते. परंतु, संचालकांच्या मागणीनुसार कंपनीने उत्पादकाला वर्षाला १०० किलो तर अनुत्पादकाला ५० किलो साखर दिली आहे. करारात नसतानाही दिलेल्या साखरेपोटी कंपनीचा ९ कोटी १७ लाख जादा खर्च द्यावा.

* करारात नसतानाही कंपनीने भागवलेले युनियन बँक व स्टेट बँकेचे मिळून ७ कोटी ९१ लाख द्यावेत.

* प्रदूषण नियंत्रणासाठी कंपनीने केलेला ८ कोटी ८२ लाख खर्च द्यावा.

----------------------

* करारानुसार कंपनीने कारखान्याला व्यवस्थापन खर्चापोटी १ कोटी २५ लाख रुपये द्यावेत.

-----------------------

* कंपनीच्या या मागण्या फेटाळल्या

कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी कंपनीने केलेल्या ९ कोटी ३७ लाखांचा खर्च आणि कामगारांच्या वाढीव पगारापोटी जादा खर्च केलेल्या १ कोटीची कंपनीची मागणी फेटाळण्यात आली.

-------------------------

-

* ४ जूनच्या बैठकीत निर्णय

सहकार सचिवांचा आदेश आणि कारखाना सुरू करण्यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी (४ जूनला) बोलविण्यात आली आहे. या बैठकीकडे गडहिंग्लजसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

--------------------------

* फोटो : ३१०५२०२१-गड-०४