शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज विभागात पावसाचा जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

गडहिंग्लज / चंदगड : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने गडहिंग्लज विभागातील हिरण्यकेशी, घटप्रभा व ताम्रपर्णी नदीच्या पाणीपातळीत ...

गडहिंग्लज / चंदगड : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने गडहिंग्लज विभागातील हिरण्यकेशी, घटप्रभा व ताम्रपर्णी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चंदगड तालुक्यातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी प्रकल्प मंगळवारी (दि. १५) पहाटे ओव्हरफ्लो झाला.

हिरण्यकेशीच्या नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे उद्या (गुरुवारी) दिवसभरात भडगाव पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

चंदगड तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून धुवाधार पावसामुळे तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा नदीच्या पाण्याची पातळी वाढ झाली आहे. रात्रभर पावसाने जोर केल्यास दोन्ही नद्यांच्या पात्रातील पाणी बाहेर पडून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

फाटकवाडी (घटप्रभा) मध्यम प्रकल्प रात्री दोन वाजता ओव्हरफ्लो झाला आहे. बुुधवार (दि. १६) सकाळी पर्यंतच्या २४ तासांत तालुक्यात सरासरी ७०.८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील तीन मध्यम व २० लघुपाटबंधारे प्रकल्पांत ५४.५५ टक्के पाणीसाठा झाला आहे.

------------------------

फोटो ओळी : दमदार पावसामुळे चंदगड तालुक्यातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी मध्यम प्रकल्प मंगळवारी (दि. १५) पहाटे ओव्हरफ्लो झाला आहे.

क्रमांक : १६०६२०२१-गड-११