शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 महिलांचा कौल ठरवणार उमेदवारांचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:40 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशाच्या लोकसंख्येत आणि विकासात बरोबरीचा सहभाग असलेल्या महिला शक्तीचा कौल लोकसभा ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशाच्या लोकसंख्येत आणि विकासात बरोबरीचा सहभाग असलेल्या महिला शक्तीचा कौल लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहे. कोल्हापूर मतदार संघात महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे तर हातकणंगले मतदारसंघात बरोबरीच्या तुलनेने महिला मतदार कमी असले तरी स्त्रीशक्तीचा कौल उमेदवारांवर गुलाल उधळणार की नाही हे ठरवणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते पायाता भिंगरी लावून प्रचार करत आहेत. मिळालेल्या वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रचारात महिलांचे प्रश्न, महिला आघाड्या आणि कार्यकर्त्यांना अस्तित्वापुरते स्थान असले तरी मतदार म्हणून त्यांची भूमिका उमेदवाराचे भवितव्य विजयात किंवा पराजयात बदलण्याचे सामर्थ्य असणारी आहे. सन २०१४ मध्ये धनंजय महाडिक यांना खासदार करण्यात महिलांचा मोठा वाटा होता या अनुभवानंतर यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच महिला मतदारांना प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्याही कार्यकर्त्यांकडून महिलांमध्ये जोमाने प्रचार सुरू आहे.बदल होतोय...लोकसंख्येच्या ५० टक्के वाटा असलेल्या महिला कुटुंबातले पुरुष सांगतील त्या उमेदवाराच्या चिन्हापुढे बोट लावून यायच्या. आता मात्र त्यांच्यात सारासार विचार करून मतदान करण्याचे व जागरूकतेचे प्रमाण वाढले आहे. प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता हा स्थायीभाव असल्याने महिलांनी एकदा ठरविले की त्या निर्णयापासून ढळत नाहीत. त्यामुळे त्यांची मने जिंकली की यशाचा मार्ग सुकर होतो. दुसरीकडे ग्रामीण भागात विशेषत: अशिक्षित किंवा वाड्या-वस्त्यावरील महिलांचे मत मात्र अजूनही पुरुषांच्याच हाती असल्याचे वास्तव असले तरी बदल होतोय हे नक्की.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक