शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

डॉक्टर दाम्पत्य खून तपासाला पूर्णविराम

By admin | Updated: January 9, 2016 00:39 IST

अर्जुन पवार मुख्य संशयित शक्य : पोलिसांनी बोलणे टाळले; इस्लामपुरात उलटसुलट चर्चा

अशोक पाटील -- इस्लामपूर इस्लामपूर येथील डॉक्टर प्रकाश कुलकर्णी व त्यांची पत्नी डॉ. अरुणा कुलकर्णी यांच्या खुनामागे चोरी हाच उद्देश असल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी अर्जुन पवार हाच मुख्य संशयित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु पोलिसांकडून अद्यापही याला दुजोरा मिळत नाही. सध्या तपासाला पूर्णविराम मिळाला असून, पोलिसांनी मात्र या प्रकरणावर बोलणे टाळले आहे.खून प्रकरणातील तपासाचे गूढ अद्यापही कायम असल्याची चर्चा आहे. या दुहेरी खुनाबाबत आमदार जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात स्थगन प्रस्तावाद्वारे गृहखात्याने केलेल्या कारवाईची विचारणा केली होती. त्यामुळे पोलिसांनी शंभरहून अधिक संशयितांची कसून चौकशी केली होती. यामध्ये शहरातील काही युवक असल्याचीही चर्चा होती. यातील काहींना ताब्यात घेतले होते. परंतु पहिल्या टप्प्यात ताब्यात घेतलेल्या तीन संशयितांपलीकडे पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे इस्लामपूरच्या पोलिसांकडून हा तपास काढून घेऊन तो स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला. परंतु तेथेही या प्रकरणात प्रगती झाल्याचे दिसले नाही.चार दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी कुलकर्णी कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी तेथूनच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी विश्वनाथ घनवट यांच्याशी संपर्क साधून तपासातील प्रगतीबाबत विचारणा केली. यावर अर्जुन पवार हा एकमेव मुख्य संशयित असृन त्याने खून करताना वापरलेले हत्यारही सापडले असल्याचे घनवट यांनी सांगितले होते.पोलिसांच्या हाती पुरावे लागले आहेत. मुख्य संशयिताचाही माग लागला आहे. परंतु हे जाहीर करण्यासाठी विलंब का लागत आहे. यामागे नेमके काय कारण आहे, याबाबत इस्लामपूर शहरात उलटसुलट चर्चा आहे. हा गुन्हा चोरीच्या उद्देशाने झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. खुनाच्या घटनेनंतरची अवस्था पाहून घाबरल्याने अर्जुन पवार हा मुख्य संशयित चोरी न करताच तेथून पळून गेला. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन संशयितांचा कितपत सहभाग आहे, हे समोर येणे बाकी आहे.पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट मला शिरोळ येथे येऊन गुन्ह्याची सविस्तर माहिती देणार होते. परंतु मी तातडीने मुंबईला गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. यामुळे घनवट यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून गुन्ह्याच्या तपासाची माहिती दिली. यामध्ये अर्जुन पवार यानेच हे कृत्य केल्याचे घनवट यांनी स्पष्ट केले आहे.- राजू शेट्टी, खासदार.क्रूरतेचे गूढ काय?अर्जुन पवार याने ज्या हत्याराने कुलकर्णी दाम्पत्याचा खून केला, ते हत्यार त्याने केवळ १३० रुपयांना खरेदी केले होते. त्याने डॉक्टर दाम्पत्यावर केलेले वार पाहिल्यानंतर, त्याची क्रूरता दिसत होती. यामुळे प्राथमिक टप्प्यात हा खून कशासाठी झाला, हेच समजत नव्हते. अखेर चोरीच्या उद्देशातूनच पवार याने हे कृत्य केल्याचे पुढे आले आहे.४पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. खून करताना वापरलेल्या १५ वस्तू जप्त केल्याची चर्चा आहे. परंतु पोलिसांनी एकही वस्तू उघडपणे दाखवलेली नाही. जप्त केलेल्या वस्तूंना साक्षीदार नसल्यानेच पोलिसांचे हात बांधले गेले आहेत. दरम्यान, अर्जुन पवार याचे घरच गुन्हेगारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सावकारकीतून मंत्री कॉलनीतील एका महिलेचा खून झाला होता. याप्रकरणी अर्जुन पवार याचा चुलता शिक्षा भोगत आहे. दोन दिवसांपूर्वी अर्जुन पवार याच्या घरातील पाण्याच्या टाकीतून काही वस्तू जप्त केल्याची चर्चा आहे.४पोलिसांच्या हाती पुरावे लागले आहेत. मुख्य संशयिताचाही माग लागला आहे. परंतु हे जाहीर करण्यासाठी विलंब का?