शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

पूरस्थिती ‘जैसे थे’

By admin | Updated: July 14, 2016 01:01 IST

पावसाची विश्रांती : ८४ बंधारे पाण्याखाली; शंभरांवर गावांचा संपर्क तुटलेलाच; धरण क्षेत्रात धुवाधार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूर परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. कोल्हापूरशी तळकोकणाशी असलेला संपर्क अजूनही तुटला असून सहा गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. अद्याप ८४ बंधारे पाण्याखाली असल्याने शंभराहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर ओसरणार असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. गेले पाच दिवस सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. सन २००५ ची पुनरावृत्ती होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती; पण बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला. दिवसभरात अधून-मधून जोरदार सरी कोसळत राहिल्या, पण गेले तीन-चार दिवस असणारा जोर काहीसा कमी झाल्याने कोल्हापूरकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाऊस कमी असला तरी पुराचे पाणी अद्याप ‘जैसे थे’च आहे. इचलकरंजीत पावसामुळे पॉवरलूमची भिंत अंगावर पडून गुरुनाथ गुंटक (इचलकरंजी) यांचा मृत्यू झाला असून इतर ठिकाणी दोन जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. धरण क्षेत्रात अजूनही धुवादार पाऊस सुरू असून, पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण ७१ टक्के, वारणा ५८, दूधगंगा ३७ टक्के भरले आहे. शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण कोणत्याही क्षणी ‘ओव्हर फ्लो’ होण्याची शक्यता आहे. घटप्रभा धरणातून प्रतिसेकंद ३२५१ तर जांबरे धरणातून १२५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोदे लघु पाटबंधारे पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातून ६७० घनफूट विसर्ग सुरू असल्याने कुंभी नदीची पातळी ‘जैसे थे’ राहिली आहे. पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, वळिवडे, आंबेवाडी, हातकणंगले तालुक्यातील घुणकी, नीलेवाडी तर शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावांचा संपर्क पूर्णत: तुटला आहे. चौदा नदीवरील ८४ बंधारे अद्याप पाण्याखाली असल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरू असली तरी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. ‘गोकुळ’ला ४० हजार लिटरला फटका गगनबावडा, करवीर तालुक्याचा पश्चिम भाग, राधानगरी, पन्हाळा तालुक्यातील बहुतांशी गावांचा संपर्क तुटल्याने वाहतूक ठप्प आहे. परिणामी दुधाची वाहतूक करता येत नसल्याने ‘गोकुळ’ दूध संघाचे संकलन सुमारे ४० हजार लिटरने कमी झाले आहे पण त्याचा वितरणावर परिणाम दिसत नाही. उन्हामुळे उत्साह माणूस चार दिवस तापाने फणफणला आणि जरा बरे वाटू लागल्यावर बाहेर जाण्याची इच्छा व्हावी, असेच काहीसे वातावरण बुधवारी सकाळी लोकांनी अनुभवले. कारण पहाटेपर्यंत कोसळणारा पाऊस सकाळ झाल्यावर मात्र गायब झाला. लख्ख सूर्यदर्शन झाले. रस्ते कोरडे झाले. वातावरण प्रसन्न झाले. लोकही रेनकोट न घालता कार्यालयाला गेले. बाजारपेठेतही गर्दी झाली. दुपारी बाराच्या सुमारास जोरदार सर आल्याने पाऊस पुन्हा पाठ सोडत नाही, अशी भीती व्यक्त झाली. दुपारनंतर मात्र पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली. दुपारीही चांगले ऊन पडले होते.