शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एकनिष्ठतेचे दिलीप पाटील यांना फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST

रमेश पाटील कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीप भगवान पाटील यांची दुसऱ्यांदा ...

रमेश पाटील

कसबा बावडा :

येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीप भगवान पाटील यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. दिलीप पाटील हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे अत्यंत निकटवर्तीय, एकनिष्ठ व विश्वासू मानले जातात. त्यामुळे पाटील यांना एकनिष्ठतेचे फळ मिळाले असल्याची चर्चा आहे.

दिलीप पाटील हे हातकणंगले तालुक्यातील आहेत. हातकणंगले तालुक्यात कारखान्याचे सर्वाधिक सभासद आहेत. यापूर्वी चेअरमनपदाचा राजीनामा दिलेले सर्जेराव माने हे हातकणंगले तालुक्यातीलच होते. त्यामुळे नवीन निवड करताना हातकणंगले तालुका डोळ्यासमोर ठेऊन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीवेळी पॅनलची उभारणी करताना माजी आमदार महादेवराव महाडिक हे प्रत्येक वेळी किमान सात ते आठ नवीन चेहऱ्यांना पॅनलमध्ये संधी देत असत. त्यामुळे एकदा संचालकपदाचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यावर पुढल्या निवडणुकीवेळी आपण पॅनलमध्ये असू किंवा नाही हे ठामपणे कुणालाच सांगता येत नसे. गेली वीस वर्षे सलग दिलीप पाटील व अन्य एक-दोन संचालक अपवाद वगळता अशी संधी कुणालाच मिळाली नाही.

येत्या काही महिन्यांतच राजाराम कारखान्याची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीला सामोरे जाताना विद्यमान चेअरमन अनुभवी, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा असणे आवश्यक असल्यानेच महाडिक यांच्याकडून दिलीप पाटील यांना संधी दिली गेली. शिवाय हातकणंगले तालुक्यातील सभासदांचाही निवडणुकीत फायदा मिळवण्याच्या दृष्टिकोणातून पाटील यांची वर्णी महत्त्वाची मानली जात आहे.

चौकट : मानेंच्या बदली पाटील

कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरच चेअरमनपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना वयोमान आणि प्रकृतीमुळे आपणास जमत नसल्याचे कारण त्यांनी दिले होते. परंतु त्याचवेळी पुढील दिशा ज्या त्या वेळी ठरवली जाईल, असा सूचक इशाराही दिला होता. माने यांचा अनुभव पाहता निवडणुकीच्या तोंडावर तोडीस तोड माणूसच चेअरमनपदाच्या खुर्चीवर असणे गरजेचे वाटल्याने महादेवराव महाडिक यांनी दिलीप पाटील यांच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ घातली.