शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीत जनवादी महिला संघटनेचा मोर्चा

By admin | Updated: August 11, 2015 00:51 IST

तलाठी कार्यालयावर मोर्चा : शासकीय अनुदान योजना, रेशन वितरण प्रस्ताव दिरंगाई

हुपरी : संजय गांधी, इंदिरा गांधी तसेच श्रावणबाळ या शासकीय अनुदान योजना व रेशन वितरण प्रस्तावाबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबतचा जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हुपरी (ता. हातकणंगले) येथील मंडल अधिकारी व गावकामगार तलाठी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.दरम्यान, याप्रश्नी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी तहसीलदार दीपक शिंदे उद्या, मंगळवारी सकाळी हुपरीतील मंडल अधिकारी कार्यालयात येणार आहेत. त्यांच्याशी करण्यात येणाऱ्या चर्चेमध्ये जर योग्य तोडगा न निघाल्यास शुक्रवारी, दि. १४ आॅगस्टला उपोषण करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. मागण्यांचे निवेदन मंडल अधिकारी के. एस. कोळी यांना देण्यात आले.संजय गांधी, इंदिरा गांधी, विधवा, निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तिवेतन योजना, आदी शासकीय योजनेतील हुपरी परिसरातील पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती गेल्या सहा महिन्यांपासून मिळणे बंद झाले आहे. तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना गेल्या आठ महिन्यांपासून धान्य मिळालेले नाही. अशा पद्धतीची कार्यवाही करीत असताना लाभार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अनुदान व निवृत्तिवेतनाचा लाभ पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे दिला जात आहे. मात्र, हातकणंगले तालुक्यामध्येच या योजनांचा लाभ मिळणे बंद झाले आहे. याबाबतची माहितीही दिली जात नाही. याचा जाब विचारण्यासाठी येथील मंडल अधिकारी व गावकामगार तलाठी कार्यालयावर सोमवारी लाभार्थ्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. माळभागावरील नवीन बसस्थानकापासून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा मंडल अधिकारी कार्यालयावर आला. तेथे घोषणा देत धरणे आंदोलन करण्यात आले. मोर्चाच्या शिष्टमंडळामध्ये सहभागी असणाऱ्या राजेंद्र शिंदे, रावसाहेब घोरपडे, अनिलकुमार जंगले, विकास पाटील, मुमताज हैदर, सुशीला हातगिणे, आप्पासो कुंभार, चंद्रकांत मगदूम, जयवंती हेरवाडे, फातिमा कवठेकर, आदींनी मंडल अधिकारी के. एस. कोळी व गावकामगार तलाठी नितीन कांबळे यांच्याशी मागण्याप्रश्नी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांशी मागणीबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी तहसीलदार दीपक शिंदे स्वत: येऊन मार्ग काढतील, अशी माहिती यावेळी मंडल अधिकारी कोळी यांनी शिष्टमंडळाला दिली. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.