शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीसाठी १६ रोजी मोर्चा

By admin | Updated: September 29, 2015 00:54 IST

राजू शेट्टी : दराचे तुकडे केले तर हातात दांडके

सांगली / शिरोळ : कायद्यातील तरतुदीप्रमाणे एफआरपी एकरकमी द्यायला हवी. जर एफआरपीचे तुकडे केले, तर साखर कारखानदार आणि सरकारविरोधात हाती दांडके घेऊन पुन्हा ताकद दाखवावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला. साखर सहसंचालकांच्या कोल्हापुरातील कार्यालयावर १६ आॅक्टोबरला मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, साखर कारखानदारांनी सर्वसाधारण सभेत ठराव करून एफआरपी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक सर्वसाधारण सभांना पहिल्या रांगांमध्ये पोसलेले गुंड व टगेच बसविले जातात. त्यामुळे खऱ्या शेतकरी सभासदाला कधीच मत मांडता येत नाही. त्यामुळे अशा ठरावांविरोधात आम्ही शेतकऱ्यांच्या अर्जांची मोहीम सुरू करणार आहोत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात असे अर्ज पोहोच केले जातील. एकरकमी एफआरपी न देणाऱ्या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी या अर्जाद्वारे केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना हा अर्ज भरायचा नाही, त्यांनी खुशाल चार किंवा पाच हप्त्यात एफआरपी घ्यावी. कारखान्यांच्या ठरावानुसार सरकार निर्णय घेणार, की शेतकऱ्यांच्या अर्जानुसार, हे आम्हाला पाहायचे आहे. नियमानुसार एफआरपीचे तुकडे पाडता येत नाहीत. तरीही जर तुकडे पाडलेच, तर आम्ही सरकारला व कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी हाती दांडके घेऊ. केंद्र शासनाने एकदा शेतकऱ्यांचा हिसका पाहिला आहे, त्यामुळे ते पुन्हा आमच्या नादी लागतील, असे वाटत नाही. कोल्हापुरात होणारे आंदोलन नंतर राज्यभरात छेडले जाईल. विभागीय सहसंचालकांकडे मोर्चे काढून राज्यभर या प्रश्नावर आम्ही लढा पुकारणार आहोत. बांधावर शेतकऱ्यांना माल विकण्याची मुभा मिळाल्यानंतर कोणी बोटे मोडायचे कारण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल, तर अशा निर्णयांना आमचा पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)निर्यातीचे धोरण हवेहंगाम संपल्यानंतर निर्यातीचे धोरण ठरवून उपयोग नाही. हंगामापूर्वीच सरकारने याबाबतचे धोरण ठरवावे, अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.