शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ‘मोटरसायकलने घेतला फास’ लावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात शहर व जिल्हा नागरी कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन ...

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात शहर व जिल्हा नागरी कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. ९९ रुपयांवर पेट्रोल गेल्याने वाहनचालकाला ते खरेदी करणे शक्य होत नसल्याने ‘मोटरसायकलनेच फास’ लावून घेतल्याचे प्रतिकात्मक आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरवाढ तात्काळ मागे घ्या, अशा मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अनंत गुरव यांना दिले.

यामध्ये म्हटले आहे की, स्वयंपाकाचा गॅस आणि पेट्रोल, डिझेल हे इंधन मानवी जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत. या वस्तू असल्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. असे असताना पेट्रोलचा प्रतिलिटर दर ९९ व डिझेलचा दर ९० रुपयांच्या पुढे, तर स्वयंपाकाचा गॅस ८०० रुपयांच्या आसपास असून हे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेले वर्षभर लॉकडाऊनमुळे जनता आर्थिक अडचणीत आहे. दरवाढ ‘जगणं’ असाहाय्य करणारी आहे. त्यांच्यामध्ये असंतोष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवाढ कमी करण्यासंबंधी काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीत, ही निंदनीय बाब आहे. त्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे किंवा गगनाला भिडलेली दरवाढ त्वरित सामान्य जनतेला परवडेल अशा पध्दतीने करावी.

यावेळी रमेश मोरे, अशोक पोवार, संभाजीराव जगदाळे, रणजित पवार, विनोद डुणूंग, चंद्रकांत पाटील, श्रीकांत भोसले, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.

चौकट

लक्षवेधी घोषणा...

मोदीजी तेरे देश में, सस्ता धूम्रपान, सस्ती दारू महेंगा गॅस, पेट्रोल, डिझेल.

पहेले चाय बेचते थे अभी चुना लगाते है

केंद्र सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय

फोटो : २२०२२०२१ कोल पेट्रोल दरवाढ आंदोलन१

फोटो : २२०२२०२१ कोल पेट्रोल दरवाढ आंदोलन२

ओळी :

पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात शहर व जिल्हा नागरी कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोटरसायकलनेच फास लावून घेतल्याचे प्रतिकात्मक आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला.

छाया : नसीर अत्तार