शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

पुढील वर्षभरही मोफत योग

By admin | Updated: June 22, 2016 01:00 IST

देवानंद शिंदे : शिवाजी विद्यापीठात मोफत योग शिबिराची वर्षपूर्ती

कोल्हापूर : पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून आजपर्यंत ‘योगशक्ती - योगयज्ञ’ अंतर्गत ३६५ दिवस योग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या योग उपक्रमाचा दोनशेहून अधिक साधकांनी दैनंदिन लाभ घेतला. साधकांचा हा प्रतिसाद पाहता हे मोफत योग शिबिर पुढील वर्षभरही राबविण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली. शिवाजी विद्यापीठ व श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी यांच्यातर्फे विद्यापीठाच्या लोककला सभागृहात गेले वर्षभर सुरू असलेल्या मोफत योग शिबिराचा वर्षपूर्ती समारंभ तसेच दुसरा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभात सुमारे ३४०० योगसाधक सहभागी झाले. यामध्ये विद्यार्र्थी, शिक्षक, अधिकारी, महिला आदींचा समावेश होता.संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणेनुसार २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मंगळवारी शिवाजी विद्यापीठाच्या लोककला सभागृहात हा कार्यक्रम सकाळी ६.३० ते ८ या वेळेत पार पडला. यावेळी कणेरी येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामी, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्र्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, माणिकराव पाटील-चुयेकर, डॉ. संदीप पाटील यांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व सेवक उपस्थित होते. प्रशिक्षक दत्ता पाटील यांनी साधकांकडून सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके करवून घेतली. (प्रतिनिधी)मोफत योग शिबिरसाधकांसाठी दररोज सकाळी ६ ते ७.३० या कालावधीत विद्यापीठाच्या लोककला सभागृहात निरंतर मोफत योग शिबिर होणार आहे. उत्तम आरोग्यासाठी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले.