शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गतवेळी साडेचार टक्के मतदान, आता सत्तेच्या रेसमध्ये

By admin | Updated: October 6, 2015 01:11 IST

भाजपची वाटचाल : या निवडणुकीत हवा; पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; केंद्रात-राज्यातील सत्तेचा फायदा ले खा जो खा भाजप

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज, मंगळवारपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्याच गतनिवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाची ताकद किती होती आणि आता त्यात नेमका काय बदल झाला आहे, याचा लेखाजोखा मांडणारी विश्लेषणात्मक राजकीय वृत्तमालिका आजपासून...(उद्याच्या अंकात शिवसेना)विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरमहापालिकेच्या गतनिवडणुकीत आता राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला तेव्हा कशीबशी १३ हजार १०४ (साडेचार टक्केच) मते मिळाली होती. त्यांचे तिघे उमेदवार निवडून आले होते. भाजप म्हणजे विशिष्ट जातीचे प्राबल्य असलेला पक्ष, संघटनात्मक बांधणीकडे झालेले दुर्लक्ष आणि जिल्ह्यातील कोणतीच राजकीय सत्ता हाती नसल्याने या पक्षाच्या महापालिकेतील वाढीलाही मर्यादा पडल्याचे वास्तव होते. आता ही साडेचार टक्क्यांची नामुष्की मागे टाकून महापालिकेचीच सत्ता काबीज करण्यासाठी हा पक्ष सरसावला आहे. महापालिकेच्या २०१०च्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती झाली होती. हे दोन्ही पक्ष त्यावेळी राज्यात व केंद्रातही विरोधात होते. दोन्ही पक्षांची युतीही भक्कम होती. या दोन पक्षांत जागांसाठी बरीच रस्सीखेच झाल्यानंतर भाजपच्या वाट्याला २३ जागा आल्या होत्या; तर चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यावेळी तत्कालीन आमदार चंद्रकांतदादा पाटील व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते.या निवडणुकीला सामोरा जाताना भाजपची ताकद सर्वच बाबतींत वाढली आहे. या पक्षाचे जिल्ह्यात आता तीन आमदार आहेत. त्याशिवाय महत्त्वाची पाच खाती असलेले कॅबिनेट मंत्रिपद चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आहे. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे केंद्रात व राज्यात भाजपची एकहाती सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ज्या भाजपची गेल्या निवडणुकीत १३ हजारांचा पल्ला गाठतानाही दमछाक झाली, त्याच पक्षाचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश जाधव यांना तब्बल ४० हजार मते मिळाली. कोल्हापूर दक्षिणमधून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून भाजपमुळेच नवखे अमल महाडिक आमदार म्हणून निवडून आले. राज्यात सत्ता आल्यामुळे कार्यकर्त्यांचाही ओघ पक्षाकडे वाढला आहे. त्यामुळेच या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीकडे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष आहे.भाजप राज्यात सत्तेत आल्यानंतर वर्षपूर्तीनंतर कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील निवडणूक होत आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभेला जे लोकमानस होते, तेच अजूनही कायम आहे की त्यात बदल झाला आहे, याचीही लिटमस टेस्ट या निवडणुकीमुळे होत आहे. म्हणूनच भाजपला या निवडणुकीत काही करून सत्ता हवी आहे. येथील भाजपचे यशापयश हे चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रतिष्ठेशी जोडले जाणार आहे. मग हे एकट्या भाजपच्या जिवावर शक्य नाही म्हणून त्यांनी ताराराणी आघाडीशी युती करून आव्हानात हवा भरली आहे. आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांच्या मदतीने भाजपचे कमळ महापालिकेत फुलविण्याची ही रणनीती आहे.