शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

चार घरफोड्यांना अटक

By admin | Updated: April 26, 2015 01:18 IST

दहा घरफोड्या उघडकीस : साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

गांधीनगर : गांधीनगरच्या पोलिसांनी दहा घरफोड्या उघडकीस आणून चार चोरट्यांना जेरबंद केले. त्या चोरट्यांकडून १९ तोळे सोने, एक किलो चांदी, एक मोटारसायकल व मोबाईल हॅण्डसेट असा चार लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव व सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मलू सिद्धू चव्हाण, सिद्धू बाळू चव्हाण (दोघे रा. शांतीनगर, उचगाव, ता. करवीर), राजू पैजल काळे (रा. इचलकरंजी), शिवाजी उत्तम काळे (रा. गडमुडशिंगी, ता. कागल) अशी चोरट्यांची नावे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांनी करवीर पूर्व भागात धुमाकूळ घातला होता. गडमुडशिंगी, चिंचवाड, गांधीनगर, उचगाव, मणेरमळा या परिसरात पकडलेल्या चोरट्यांनी दहा घरफोड्या केल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये झालेल्या चोऱ्यांचा गांधीनगरचे स. पो. नि. संभाजी गायकवाड, पो. उपनिरीक्षक राम गोमारे, पो. हवालदार कृष्णात पिंगळे, प्रदीप जाधव, रमेश धादवड, नारायण गावडे, राकेश माने, अमित सुळगावकर, शशिकांत पाटील यांनी तपास करून चार चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. सिकंदर चाँदसाब मुजावर, रुद्राप्पा बसव कुंभार (रा. मणेरमळा), श्रीकांत विश्वास राणे, अशोक दादू माने, अभिजित राजन परदेशी, पोपट दिनकर माने, किरण उद्धव पवार (सर्व रा. उचगाव), विक्रमसिंह बबनराव पाटील (रा. चिंचवाड), दत्तात्रय विलास चव्हाण, राजेंद्र बाबूराव पाटील (रा. गडमुडशिंगी) अशा दहाजणांची घरे फोडल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती अमरसिंह जाधव यांनी दिली. (वार्ताहर)