शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

जावीरला पसार करणाऱ्या चौघांना अटक

By admin | Updated: December 16, 2014 00:57 IST

तीन दिवसांची पोलीस कोठडी : गुन्हे अन्वेषणने आवळल्या मुसक्या

कोल्हापूर : पन्हाळा न्यायालयात खटल्यासंदर्भात घेऊन जात असताना पोलिसांवर हल्ला करून कैदी व कुख्यात गुन्हेगार विजय जावीर याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या चौघा साथीदारांच्या मुसक्या इचलकरंजी गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या. त्यांना आज, सोमवारी पन्हाळा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. फरार कैदी जावीर मात्र पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. त्याच्या मागावर पोलीस आहेत, अशी माहिती उपअधीक्षक पंकज शिरसाट यांनी दिली. विजय जावीर याला कोतोली (ता. पन्हाळा) येथील सराफास लुटल्याप्रकरणी पन्हाळ्यातील प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणीसाठी कळंबा मध्यवर्ती कारागृहातून हेडकॉन्स्टेबल अशोक कोरवी व पोलीस नाईक जावेद पठाण हे दोघे एस.टी. बसने घेऊन आले होते. एस.टी.तून उतरल्यानंतर काही अंतरावरच त्याच्या साथीदारांनी पोलिसांच्या डोळ्यांत चटणीपूड टाकून त्याच्यासह पलायन केले होते. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत अशोक कोरवी व जावेद पठाण यांना निलंबित केले. दरम्यान, कैदी जावीर याच्या शोधासाठी पोलिसांनी जिल्ह्यात (पान १० वर)अटक केलेल्यांची नावे अशी : संशयित बाळासाहेब गावडेकर (रा. प्रगतीनगर, पाचगाव), दत्तात्रय बबन माळवदे (वय २२, कारंडे मळा, इचलकरंजी), आबा भगवान गरड (तारदाळ) व रामा कचरू गरड (रा. झोपडपट्टी, इचलकरंजी) कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैदी व कुख्यात गुन्हेगार विजय जावीर याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडे दिला आहे. फरार जावीर याचा ठावठिकाणा मिळाला असून, लवकरच त्याला बेड्या ठोकू. - डॉ. मनोजकुमार शर्मा (पोलीस अधीक्षक)