शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चात चाळीस संघटनांचा सहभाग

By admin | Updated: October 10, 2016 00:46 IST

योगदानाच्याही घोषणा : मराठा क्रांती मोर्चासाठी शाहूनगरीत समाज, संघटना एकवटल्या

कोल्हापूर : कोल्हापुरात १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सुमारे ४० समाज व संघटनांनी रविवारी मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक घेऊन पाठिंबा जाहीर केला. मोर्चात सहभागी होऊ असे सांगतानाच मोर्चासाठी काहीतरी योगदान देण्याचीही तयारी अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. कोल्हापुरातील मराठा क्रांती मूक मोर्चाच्या तयारीसाठी जिल्ह्यातील अनेक संघटनांनी जय्यत तयारी केली आहे. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका, मेळावे, रॅली घेऊन जनजागृती रॅली काढून मोर्चाला ‘यायला लागतंय’ असे आवाहन केले जात आहे. रविवारी दुपारी राजर्षी शाहूंच्या भूमीतील सुमारे ४० हून अधिक वेगवेगळ्या समाज व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मुस्लिम बोर्डिंगमध्ये झाली. शाहूंच्या विचारांचे पाईक राजर्षी शाहू राजांच्या विचारांचे पाईक म्हणून कोल्हापूरच्या मोर्चात विविध समाज, संघटना एकत्र आल्या आहेत. कोल्हापूरच्या मातीत सर्व जाती-धर्माची माणसे एकत्र येतात हे मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे. या ऐक्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दूर ठेवणे योग्य आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे एकत्र येऊन देशातील एकात्मतेला नवी दिशा देण्याचे काम कोल्हापूर नगरीतून निश्चितच होईल अशीही अपेक्षा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. सहभागी होणाऱ्या संघटना अशा कोल्हापूर जिल्हा सिंधी समाज, भटक्या विमुक्त जाती-जमाती विचार मंच, सिंधी सेंट्रल पंचायत, लोणार समाज संघ, सुवर्णकार समाज संघ, कोळी समाज, महाराष्ट्र माथाडी कामगार संघ, धनगर समाज संघटना, वीरशैव वाणी समाज संघ, बागवान समाज, लमाण समाज, कोल्हापूर जिल्हा मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशन, मुस्लिम खाटिक समाज, को. जि. खारे मासे विक्री संघ, बहुजन दलित महासंघ, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट), वीरशैव समाज कक्कया, कोल्हापूर लिंगायत समाज, यादव-गवळी समाज संघटना, रजपूत समाज, जि. मुल्ला-मुल्लाणी समाज, कंझारभाट समाज, माळी समाज, गिरी-गोसावी समाज, ओतारी समाज, जि. वडार समाज संघटना, कोचीकोरवी समाज, को. जि. मुस्लिम बेपारी समाज, पारधी समाज संघ, घिसाडी समाज संघ, ढोर समाज, चर्मकार समाज, गुरव समाज, महादेव कोळी समाज, धनगर महासंघ, मुस्लिम खाटिक समाज, पीपल्स रिपाइं पार्टी, फोर व्हीलर चालक असोसिएशन, सर्वोदय मंडळ, को. जि. फूटवेअर असोसिएशन.